नंदुरबार जिल्हयात गणरायाचे उत्साहात आगमन

कोरोनाचे विघ्न दूर करण्यासाठी भक्तांचे बाप्पांना साकडे
नंदुरबार जिल्हयात गणरायाचे उत्साहात आगमन

नंदुरबार | प्रतिनिधी

नंदुरबार शहरासह जिल्हयात आज गणरायाचे उत्साहात आगमन झाल. परंतू यंदाही कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर ढोलताशांच्या गजर व गुलालाच्या उधळणाशिवाय गणरायाची स्थापना करण्यात आली. नंदुरबार जिल्हयासह राज्य व देशावरील कोरोनाचे विघ्न दूर व्हावे यासाठी गणपती (Ganpati) बाप्पांना साकडे घालण्यात आले.

नंदुरबार शहरासह जिल्हयात आज गणरायाचे उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. गेल्या आठवडयापासूनच गणरायाच्या स्वागताची तयारी बालगोपालांसह गणेश मंडळांनी केली होती. यंदाही कोरोनाच्या सावटामुळे कुठलीही मिरवणूक काढण्यास परवानगी नसल्याने गणरायाचे ढोलताशांच्या गजराशिवाय व गुलालाच्या उधळणाशिवाय स्वागत करण्यात आले. दोन दिवसांपासून गणेशमुर्त्या खरेदी करण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती.

धुळे (Dhule) रस्त्यावरील सर्व गणेश स्टॉल विक्रेत्यांच्या मूर्तींची विक्री झाली. मात्र कोपर्‍यात असलेल्या गणेशमूर्ती कारखानदारांच्या अनेक मूर्ती ग्राहकांअभावी तशाच पडून राहिल्याने त्यांना मोठा आर्थिक फटका बसला.

मानाचा श्री दादा व श्री बाबा गणपतीची रथात प्रतिष्ठााना करण्यात आली. कोरोना महामारीचा गणेशमूर्तिकारांना पन्नास लाखांचा फटका बसला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मिरवणुकीला परवानगी नाकारण्यात आल्याने यंदा मिरवणुकीची धामधूम दिसली नाही.

केवळ धुळे रस्त्यावर असलेल्या गणेशमूर्तींच्या स्टॉलवर गर्दी दिसली. मिरवणूक नसली तरी गणेशभक्तांचा जोश कायम होता.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com