नंदुरबारात आठ रुग्ण आढळले
नंदुरबार

नंदुरबारात आठ रुग्ण आढळले

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

नंदुरबार - Nandurbar - प्रतिनिधी :

नंदुरबार जिल्हयात आज पुन्हा कोरोनाचे आठ रुग्ण आढळून आले असून 20 जण संसर्गमुक्त झाले आहेत. त्यामुळे कोरोनामुक्त रुग्णांची संख्या 582 झाली आहे.

नंदुरबार जिल्हयात आज पुन्हा कोरोनाचे आठ रुग्ण आढळून आले आहेत. यात तळोदा व नंदुरबार येथील प्रत्येकी तीन, शहादा येथील दोन रुग्णांचा समावेश आहे. तळोदा येथील मोठा माळीवाडा येथील 48 वर्षीय महिला, विमलनगरातील 40 वर्षीय पुरुष, काका शेठ गल्लीतील 36 वर्षीय पुरुष, नंदुरबारातील परदेशीपुरा राममंदिराजवळील 61 वर्षीय पुरुष, 73 वर्षीय पुरुष, 51 वर्षीय महिला, शहादा येथील खोलगल्लीतील 10 वर्षीय बालक, कोविड सेंटरमधील 32 वर्षीय पुरुष आज कोरोनाबाधीत आढळून आले.

दरम्यान, आज 20 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यात नंदुरबारातील 16 रुग्ण, नवापुरातील 2, शहादा येथील 2 रुग्णांचा समावेश आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com