कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी गांभिर्याने प्रयत्न करा

विभागीाय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अधिकार्‍यांना सूचना, जिल्हयातील करोनास्थितीचा घेतला आढावा

नंदुरबार - Nandurbar - प्रतिनिधी :

जिल्ह्यातील कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी अधिकार्‍यांनी गांभिर्याने प्रयत्न करावे आणि बालकांच्या आरोग्य तपासणीविषयी माहिती घेण्यासाठी प्रत्येक अंगणवाडीला भेट द्यावी, असे निर्देश नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. ते म्हणाले, तालुका वैद्यकीय अधिकारी आणि बाल विकास प्रकल्प अधिकार्‍यांनी बालकांच्या आरोग्य तपासणीचा दैनंदिन आढावा घ्यावा.

प्रत्येक बालकाचे वजन आणि उंची मोजली जाईल याची खात्री करावी. अतितीव्र कुपोषित बालकांवर उपचार करण्यासाठी गरजेनुसार त्रिस्तरीय उपचार सुविधेचा उपयोग करावा.पहिल्या टप्प्यात उपचारानंतरही वजनात सुधारणा होत नसल्यास अशा बालकांना पोषण व पुनर्वसन केंद्रात दाखल करावे.

अपूर्ण असलेल्या अंगणवाडी इमारतींची कामे त्वरित पूर्ण करावी. प्रत्येक अंगणवाडीला स्वतःची इमारत राहील याबाबत आवश्यक नियोजन करावे. प्रत्येक महिन्यात कुपोषणाबाबत आढावा घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

विविध विषयांचा आढावा

विभागीय आयुक्त गमे यांनी बैठकीत विविध विषयांचा आढावा घेतला. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अपूर्ण घरकूलांची कामे त्वरित पूर्ण करण्यात यावी. वसुंधरा अभियानात शहादा आणि प्रकाशा गावाने क्रमवारीत सुधारणा करण्यासाठी मागील वर्षातील त्रुटी दूर कराव्यात. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत ग्रामपंचायतींचा सहभाग वाढवावा. पावसाळ्यात वृक्ष लागवडीची कामे मोठ्या प्रमाणात घ्यावी. मतदार छायाचित्र संकलनाचे प्रलंबित काम गावनिहाय आढावा घेऊन पूर्ण करावे असे त्यांनी सांगितले. बैठकीस उपजिल्हाधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, उप विभागीय अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

करोनामुळे झालेल्या मृत्यूच्या कारणांचे विश्लेषण करा

कोरोना संसर्गामुळे जिल्ह्यात झालेल्या मृत्यूमागील कारणांचे विश्लेषण करण्यात यावे, त्यासाठी मयत व्यक्तींच्या कुटुंबियांकडूनही माहिती घ्यावी, असे विश्लेषण पुढील काळात कोरोना नियंत्रणाच्या उपाययोजना करण्यासाठी मार्गदर्शक ठरेल, असे प्रतिपादन नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, उपारयुक्त अरविंद मोरे, अपर जिल्हाधिकारी महेश पाटील आदी उपस्थित होते.

श्री.गमे म्हणाले, मृत्यूच्या कारणांचे सूक्ष्म विश्लेषण करून त्याचा अहवाल तयार करावा. पुढील काळात कोरोना प्रतिबंधक उपाययोजना करण्यासाठी असे विश्लेषण उपयुक्त ठरेल. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर २४ आणि ४८ तासात मृत्यू झालेल्या व्यक्तींमध्ये आढळलेल्या लक्षणांचेही विश्लेषण करण्यात यावे. सर्वेक्षणातील त्रुटी आढळल्यास त्या दूर करण्याचा प्रयत्न करावा.

आरटीपीसीआर चाचण्यांचे प्रमाण वाढवावे

खाजगी वाहतूक करणार्‍या वाहनातील प्रवाशांची स्वॅब चाचणी करण्यात यावी. कोरोना बाधित आढळलेल्या भागात विशेषत्वाने लक्ष द्यावे. तिसर्‍या लाटेची शक्यता लक्षात घेता मोहीम स्तरावर गंभीर आजार असलेल्या मुलांची माहिती घ्यावी आणि अशा मुलांकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना शिक्षकांना द्याव्यात.

प्रस्तावित ऑक्सिजन प्रकल्पाचे काम लवकर पूर्ण करण्यात यावे. प्रकल्पाच्या ठिकाणी आपत्कालीन सुविधा तयार ठेवावी. कोरोना लसीकरणाचे प्रमाण वाढविण्याचा प्रयत्न करावा. १८ वर्षावरील व्यक्तींचे १०० टक्के लसीकरण पूर्ण करणार्‍या पहिल्या २ ग्रामपंचायतीना सामाजिक उत्तरदायित्व निधीतून आरओ प्लॅन्ट उपलब्ध करून देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. जिल्हा प्रशासनाने कोरोना नियंत्रणासाठी चांगल्या पायाभूत सुविधा निर्माण केला असल्याचेही श्री.गमे म्हणाले.

व्हॅक्सिन व्हॅनचे उद्घाटन

बैठकीपूर्वी श्री.गमे यांच्या हस्ते माझगाव डॉकतर्फे सामाजिक उत्तरदायित्व निधीच्या माध्यमातून प्राप्त झालेल्या व्हॅक्सिन व्हॅनचे उद्घाटन करण्यात आले. त्यांनी व्हॅनची माहिती घेतली. या वाहनाचा उपयोग लसींच्या वाहतूकीसाठी करण्यात येणार असून वाहनात तापमान नियंत्रित ठेवण्याची सुविधा आहे. त्यानंतर विभागीय आयुक्तांनी नियोजन भवनाच्या इमारतीच्या बांधकामाची माहिती घेतली.

जिल्हा रुग्णालयाला भेट

विभागीय आयुक्त श्री.गमे यांनी जिल्हा रुग्णालयातील ऑक्सिजन प्रकल्प, डायलिसिस वॉर्ड, नवजात अर्भक कक्षाला भेट दिली. त्यांनी म्युकर मायकोसिस कक्षास भेट देऊन रुग्णांवर होणार्‍या उपचाराबाबत माहिती घेतली. कोरोना बाधित बालकांसाठी तयार करण्यात आलेल्या कक्षाचीदेखील त्यांनी पाहणी केली. बालकांसाठी आवश्यक सर्व औषधे आणि सुविधा पुरेशा प्रमाणात तयार ठेवण्याच्या सूचना त्यांनी अधिकार्‍यांना दिल्या.

श्री.गमे यांनी जिल्हा रुग्णालयात आलेल्या रुग्णांशी संवाद साधला. त्यांनी रुग्णालयातील लसीकरण केंद्राला भेट देऊन लसीकरणाची माहिती घेतली. कोरोना लसीकरणासाठी वाढती गर्दी लक्षात घेता अतिरिक्त पथक नेमण्याचा सूचना त्यांनी दिल्या. जिल्हा रुग्णालयातील किरकोळ दुरुस्तीची कामे बांधकाम विभागाने त्वरित करावीत असे निर्देश त्यांनी दिले.आयुष रुग्णालय इमारतीच्या कामालाही वेग देण्याचे निर्देश त्यांनी संबंधितांना दिले. यावेळी आरोग्य उपसंचालक पी.डी.गांडळ, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.रघुनाथ भोये, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन बोडके आदी उपस्थित होते. रुग्णालय परिसरात विभागीय आयुक्त गमे, जिल्हाधिकारी डॉ.भारुड आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गावडे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

प्रकाशा येथे लसीकरण केंद्राला भेट

नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी शहादा तालुक्यातील प्रकाशा येथे लसीकरण केंद्राला भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन बोडके, जिल्हा साथ रोग अधिकारी डॉ.नारायण बावा, उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे, तहसिलदार मिलिंद कुलकर्णी, शिक्षणाधिकारी डॉ.राहुल चौधरी आदी उपस्थित होते.

श्री.गमे म्हणाले, नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. परंतू ग्रामस्थांनी कोरोनावर नियंत्रण करण्यासाठी १०० टक्के लसीकरणासाठी प्रयत्न करावा. अधिकार्‍यांनी लसीच्या उपलब्धतेनुसार सूक्ष्म नियोजन करावे. तिसर्‍या लाटेचा धोका टाळण्यासाठी नागरिकांनी मास्क घालणे, शारीरिक अंतर पाळणे आणि साबणाने हात स्वच्छ धुणे या त्रिसूत्रीचा वापर करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

श्री.गावडे म्हणाले, जिल्ह्याने लसीकरणाचा साडेतीन लाखाचा टप्पा पूर्ण केला आहे. त्यासाठी अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्ती यांच्यासह सर्व विभागातील कर्मचार्‍यांनी जनजागृतीसाठी चांगले प्रयत्न केले. सोंगाड्या पार्टीसारख्या लोककलेच्या माध्यमातूनही जनजागृतीचे प्रयत्न करण्यात आले. जिल्ह्यात लसीकरणाचे उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी ग्रामस्थांनी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले.विभागीय आयुक्तांनी आरोग्यवर्धिनी केंद्राला भेट देऊन तेथील सुविधांची माहिती घेतली. त्यांनी लसीकरण करणार्‍या कर्मचार्‍यांशीदेखील संवाद साधला व त्यांच्या कामाचे कौतुक केले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com