धडगावात हातगाडीवर औषधांची विक्री ?

मेडीकल असोसिएशनचे कारवाईसाठी तहसीलदारांना निवेदन
धडगावात हातगाडीवर औषधांची विक्री ?

मोलगी Molgi। वार्ताहर

ठिकठिकाणाहून येणार्‍या विक्रेत्यांकडून (vendors) धडगाव बाजारपेठेत (Dhadgaon market) लोटगाडीवरुन उंदिर व अन्य भक्षकांच्या नियंत्रणासाठी असलेले विषारी औषध विक्री (Toxic drug sales) होत आहे. त्यांच्याकडून गुरांची व अन्य औषधी देखील लोटगाडीवरुनच विक्री करण्यात येत असल्याची तक्रार (Complaint) धडगाव तहसीलदारांकडे (Dhadgaon Tehsildar) करण्यात आली आहे.

धडगाव तालुका केमिस्ट ण्ड ड्रगिस्ट असोसिएशनमार्फत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात आठवडे बाजार व अन्य दिवशी धडगाव येथे उंदिर व अन्य भक्षक मारण्याचे विषारी औषधांची जिल्हाभरातून येणार्‍या व्यापार्‍यांकडून विक्री करण्यात येत आहे. ते बाहेरून येत असल्याने ते विविध प्रकारच्या लोटगाड्यांचा आधार घेत औषधी विकत आहे.

परंतु त्यांच्याकडून केवळ उंदरांचीच औषधी विक्री होत नाही, तर गुरांसाठी आवश्यक असलेली औषधी व अन्य औषधी देखील विकली जात असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.

या औषधांचा विष म्हणत चुकीचा वापर देखील होण्याची शक्यता केमिस्ट ण्ड ड्रगिस्ट असोसिएशनने वर्तवली आहे. अशा संभाव्य घटना टाळण्यासाठी संबंधित विक्रेत्यांवर योग्य कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

निेवदनावर केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे जिल्हास्तर सदस्य नितीन सोनगरे, तालुकाध्यक्ष जामसिंग पराडके, उपाध्यक्ष प्रकाश विंचुरकर, सचिव दिनेश शिवदे, सहसचिव मोहन वळवी, दलीत जगदाळे, विजय हुरेज यांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com