दोंडाईचा - Dondaicha - श.प्र :

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव व मृत्युदर बघता ग्रामीण भागातील नागरिकांनी शहरात येणे देखील बंद केल असल्याचे चित्र दिसून येत आहे.

प्रवासीच नसल्याने दोंडाईचा आगाराच्या 20 ते 25 एसटी बस फेर्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आगाराला दररोज एक ते दीड लाखाचा फटका बसत आहे. तर शनिवार-रविवारी नंदुरबार आगाराच्या सर्व फेर्या रद्द असल्याने दोंडाईचा बस स्थानकांना शुकशुकाट दिसून येत आहे.

दोंडाईचा शहरासह ग्रामीण परिसरात कोरोनाचा उद्रेक सुरू आहे. मृत्यु दर देखील मोठ्या प्रमाणात वाढला आहे. करोनाच्या भितीपोटी नागरिक ग्रामीण भागातून शहरी भागात येत नाहीत. बाहेरगावी जाणे देखील बंद केल्याचे चित्र दिसून येत आहे.

नागरिक घराच्या बाहेर पडत नाहीत. प्रवासीच नसल्याने परिणामी दोंडाईचा आगाराने 20 ते 25 एसटी बसच्या फेर्या रद्द करण्यात आल्या आहेत. यात दिवसाला दोंडाईचा आगाराच्या उत्पन्नात एक ते दीड लाखाचा फटका सहन करवा लागत आहे.

नंदुरबार जिल्हाधिकार्यांच्या आदेशाने शनिवारी व रविवारी जनता कर्फ्यू असल्याने नंदुरबार आगाराच्या सर्व बसेस रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे दोंडाईचा बसस्थानकात शुकशुकाट दिसून येत आहे..

व्यावसायीकांनाही फटका- करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेवून आता नागरिक खरेदीलाही बाहेर पडत नाहीत. म्हणून व्यापारी बांधवांच्या उत्पन्नात देखील मोठ्या प्रमाणावर घट जाणवत आहे.

व्यापारी वर्गात देखील चिंतेचे वातावरण आहे. त्यात येत्या दोन दिवसात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.