नगरपालिकांनी कोविड सेंटर उभारण्याचे जिल्हाधिकार्‍यांचे निर्देश
USER

नगरपालिकांनी कोविड सेंटर उभारण्याचे जिल्हाधिकार्‍यांचे निर्देश

जिल्हा आरोग्य अधिकारी पुरवतील वैद्यकीय सेवा

नंदुरबार | प्रतिनिधी- NANDURBAR

जिल्ह्यातील नगरपालिकांनी एक कोविड सेंटर उभारून ते चालवावे आणि या केंद्रात जेवण, पाणी, स्वच्छता या सेवा पुरवाव्यात असे निर्देश जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले आहेत.

कोविड-१९ चा संसर्ग झपाट्याने वाढत असल्याने कोविड सेंटर उभारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जिल्हा आरोग्य अधिकारी या कोविड सेंटरला डॉक्टर व नर्सिंग सेवा पुरवतील.

ऑपरेटर्स व इतर अनुषंगीक कामासाठी चांगले कर्मचारी अथवा शिक्षकांची नियुक्ती करून त्यांना प्रशिक्षण देतील असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

दिवसाला २००० चाचण्या करण्याचे निर्देश

जिल्हा रुग्णालयातील कोविड विषाणू लॅबमध्ये दिवसाला २ हजार चाचण्यांची तपासणी करून अहवाल नागरिकांना मिळतील असे जिल्हा शल्य चिकीत्सकांनी नियोजन करावे आणि चाचणी अहवाल पोर्टलवर अपडेट करावा.

जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांनी आवश्यक प्रमाणात रॅपीड अँटीजन विकत घ्याव्यात व त्या प्राथमिक आरोग्य केंद्रांना उपलब्ध करून द्याव्यात.

रॅपीड अँटीजेन चाचणीत पॉझिटीव्ह आढळणार्‍या रुग्णांना संस्थात्मक अलगीकरण किंवा विलगीकरण कक्षात ठेवावे. या चाचणीत निगेटीव्ह आलेल्यांचे नमुने आरटीपीसीआर चाचणीसाठी जिल्हा रुग्णालय नंदुरबार येथे पाठवावे.

जिल्हा शल्य चिकीत्सकांनी आरटीपीसीआर चाचणी प्रलंबित राहणार नाही याची दक्षता घ्यावी, असेही निर्देश जिल्हाधिकार्‍यांनी दिले आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com