खा.डॉ.हिना गावितांच्या तक्रारीमुळेच रोटरी वेलनेसचे रेमडेसिविर वाटप बंद

मा.आ.चंद्रकांत रघुवंशींचा आरोप
खा.डॉ.हिना गावितांच्या तक्रारीमुळेच रोटरी वेलनेसचे रेमडेसिविर वाटप बंद

नंदुरबार | प्रतिनिधी- nandurbar

रोटरी वेलनेस सेंटरच्या माध्यमातून जिल्हयातील गरजूंना रेमडीसीवर इंजेक्शन उपलब्ध करून देण्याची सोय केली होती . परंतु खा डॉ हीना गावित यांच्या तक्रारींमुळे रैमडीसिवर वाटप बंद झाल्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह रूणांच्या नातेवाईकांना वणवण भटकावे लागत असल्याचा आरोप शिवसेनेचे नेते तथा माजी आचंद्रकांत रघुवंशी यांनी केला आहे.

रुग्णसेवा प्रामाणिकपणे केली आहे केली आहे . तक्रारीची चौकशी होऊ द्या. चौकशांना कधीही घाबरलो नाही असेही रघुवंशी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. याबाबत माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की , रोटरी वेलनेस सेंटरने ५ हजार रेमडेसिविर इंजेक्शन विकत आणले होते . त्यातील १ हजार इंजेक्शन शासनाने उपलब्ध करून दिले . शासनाकडून घेतलेले १००० रेमडेसिविर इंजेक्शन ५९४ रुपयांना घेतले तेच आम्ही ५५० रुपयांना रुग्णांना उपलब्ध करुन दिले .

मागील कालावधीत १५०० रुपयांना घेतलेले रेमडेसिविर इंजेक्शन अवघ्या १२०० रुपयांना दिले . त्याचप्रमाणे १७०० रुपयांचे रेमडीसीवर १५५० रुपयांना म्हणजेच सेवा म्हणून कमी भावात दिले यात काय चूक केली परंतु , स्वतः काही करायचं नाही आणि काम करणार्‍यांचे पाय खेचून राजकारण करणे योग्य नव्हे .

धुळ्याचे खा.डॉ.सुभाष भामरे यांनी ५ हजार रेमडेसिविर इंजेक्शन जिल्हाधिकारी यादव यांना सुपूर्द केले . नाशिकचे खा. हेमंत गोडसे यांनी ७ हजार तेथे स्थानिक ठिकाणी वाटप केले.तर भाजप नेते खा.सी.आर.पाटील दररोज ५ हजार इंजेक्शनचे वाटप करत आहेत . मग खा.डॉ.हिना गावित यांनी रेमडेसिविरचे वाटप का नाही केले असा प्रश्न माजी आ . रघुवंशी यांनी प्रसिद्धीपत्रकात केला आहे .

रेमडेसिविर वाटपात भेदभाव नाहीच जिल्हयातील प्रत्येक गरजूंना रेमडेसिविर वाटप करत असतांना भेदभाव केला नाही . याउलट भाजपाच्या कार्यकर्त्यांना सर्वात जास्त उपलब्ध करून दिले.कोरोना पक्ष , जात , धर्म पाहून होल नाही . रोटरी वेलनेस सेंटरचे रेमडेसिविर वाटपाचे काम अत्यंत चांगल्या पद्धतीने होत असतांना खा.डॉ हिना गावित यांनी तक्रार केल्यामुळे ते बंद पडले आहे व आज रुग्णांना गैरसोयचा सामना करावा लागत असल्याचे माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी म्हटले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com