नंदुरबारातील ५०० गरजूंना प्रत्येकी एक हजाराचे किराणा वाटप

नंदुरबारातील ५०० गरजूंना प्रत्येकी एक हजाराचे किराणा वाटप

जेके पार्क इंटरनॅशनल फाऊंडेशनचा स्तुत्य उपक्रम

नंदुरबार | प्रतिनिधी- NANDURBAR

येथील जेके पार्क इंटरनॅशनल फाऊंडेशनतर्फे शहरातील ५०० गरजू व्यक्तींना प्रत्येकी एक हजार रुपयांचा किराणा वाटप करण्यात आला आहे. गरजूंना कुपन देण्यात आले असून ते शहरातील एका किराणा दुकानावर मिळणार आहे. या स्तुत्य उपक्रमाचा इतरांनीही आदर्श घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आले आहे.

नंदुरबार येथील जेके इंटरनॅशनल पार्क फाऊंडेशनतर्फे कोरोनाच्या काळात गेल्या वर्षभरापासून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. यापुर्वी हिवाळयात गरजूंना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले होते.

सध्या ऑक्सीजनचा तुटवडा जाणवत असल्याने तसेच लिक्वीड ऑक्सीजन वेळेवर उपलब्ध होत असल्याने हवेतून ऑक्सीजन निर्मिती करणारे ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटरचे तब्बल २० यंत्र त्यांनी उपलब्ध करुन दिले आहे.

गरजूंना ते अल्प दरामध्ये उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. आणि आता ५०० गरजूंना प्रत्येकी एक हजार रुपयांचा किराणा वाटप करण्यात येत आहे. या ५०० गरजू लोकांना पोलीस उपअधीक्षक सचिन हिरे यांच्या हस्ते कुपन वाटप करण्यात आले.

फाऊंडेशनचे अध्यक्ष हाजी किस्मत शेख यांनी हे कुपन उपलब्ध करुन दिले असून शहरातीलच किराणा दुकानावर कुपन दिल्यास त्यांना किराणा माल मिळणार आहे.

माळीवाडा येथे झालेल्या एका छोटेखानी कार्यक्रमात पोलीस उपअधीक्षक सचिन हिरे यांच्या हस्ते कुपन वाटप करण्यात आले. यावेळी किस्मत शेख, मोहम्मद आबिद मिस्त्री, संभाजी माळी, सैयद जफर, नसीर पठान, तारिक अनवर उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com