1009 बालकांना पेसा निधीतून कपडे वाटप

भांग्रापाणी गृपग्रामपंचायतीने बालकांच्या चेहर्‍यावर फुलवले हास्य
1009 बालकांना पेसा निधीतून कपडे वाटप

रविंद्र वळवी

मोलगी Molgi।

कोरोना महामारीमुळे नव्या कपड्यांपासून दूर राहिलेल्या 3 ते 6 वर्ष वयोगटातील बालगोपालांना babysitters अक्कलकुवा तालुक्यातील भांग्रापाणी गृप ग्रामपंचायतीतर्फे Bhangrapani Group Gram Panchayat पेसा PESA fund अंतर्गत प्राप्त निधीतून कपडे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे सात गावातील 1009 बालकांच्या चेहर्‍यावर हास्य फुलले. एवढेच नव्हे तर कोरोनाने हतबल झालेल्या पालकांनादेखील काहीअंशी आधार मिळाला आहे.

मोलमजुरी व काबाडकष्टावर अवलंबून असलेल्या पालकांचा रोजगार कोरोना या जागतिक संकटामुळे बुडाला. या संकटामुळे प्रत्येकाच्या अडचणी काही पटीने वाढल्या. त्यातून लहान मुलेही सुटले नाही, प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष त्यांच्यावरही महामारी ओढवली. या संकटातून सावरण्यासाठी भांगरापाणी गृप ग्रामपंचायतीतर्फे आपल्या अंतर्गत भांग्रापाणी, जामली, उमटी, पिमटी, पिंप्रापाणी, वेरी व चनवाई या सात गावांमधील 21 अंगणवाड्यांमध्ये प्रवेशित 1009 बालकांना ग्रामकोष समितीच्या 5 टक्के अबंध निधीतून कपडे वाटप करण्यात आले. याचा लाभ 554 मुले व 455 मुली अशा एकूण 1009 बालकांनी घेतला. या कार्यक्रमात माजी सरपंच इमाबाई भरतसिंग तडवी, सामाजिक कार्यकर्ते भरतसिंग तडवी, पंचायत समिती सदस्य तुकाराम वसावे, ग्रामविकास अधिकारी नरोत्तम बिर्हाडे, माजी सरपंच सोन्या वसावे, कालुसिंग तडवी, धिरसिंग वसावे यांच्यासह सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस शिवाय पालक देखील उपस्थित होते. यावेळी ग्रामविकासाच्या काही विषयांवर चर्चा करण्यात आली.

भांग्रापाणी ग्रामपंचायतीचा हा उपक्रम तळागाळातील बालकांच्या चेहर्‍यावर आनंद झळकवणारा ठरला. या उपक्रमातून ग्रामपंचायत प्रशासनाने मुलांच्या पालकांना ही काहीअंशी आधार देण्याचा प्रयत्न केला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com