सव्वादोन लाख पक्ष्यांची विल्हेवाट

27 फार्ममध्ये 10 लाख पक्षी
सव्वादोन लाख पक्ष्यांची विल्हेवाट

नंदुरबार । प्रतिनिधी Nandurbar

बर्ड फ्लूच्या पार्श्वभुमीवर गेल्या तीन दिवसात जिल्हयातील नवापूर येथील चार पोल्ट्री फार्ममधील 2 लाख 21 हजार 492 पक्ष्यांचे कलींग अर्थात शास्त्रोक्त पद्धतीने पक्षांची विल्हेवाट लावण्यात आली आहे.

नवापूर येथे पंधरा वर्षांनंतर पुन्हा बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव झाला आहे. निगराणी क्षेत्रातील एकूण 27 पोल्ट्री फार्ममध्ये 10 लाख 4 हजार 140 पक्ष्यांची गणना झाली. त्यापैकी 32 हजार 791 मरतूक आढळले आहे. बाधित क्षेत्रात 16 पोल्ट्रीमधील 4 लाख 90 हजार 485 कुक्कुट पक्षी आहेत. पहिल्या टप्प्यात नमुने पॉझिटीव्ह आलेल्या 4 पोल्ट्री फार्ममधील साधारण 1 लाख 26 हजार पक्ष्यांच्या कत्तलीचे काम पशुसंवर्धन विभागामार्फत सुुरू करण्यात आले.

दि. 7 फेब्रुवारी रोजी डायमंड पोल्ट्री फार्ममधील 31 हजार 400 पक्षांचे कलींग करण्यात आले आहे. दि.8 फेब्रुवारी रोजी डायमंड पोल्ट्री फार्ममधील 7 हजार 648, सहयोग पोल्ट्री फार्ममधील 43 हजार 35, परवेज पोल्ट्रीफार्ममधील 8 हजार, वासिम पोल्ट्री फार्ममधील 38 हजार 622, आमलीवाला पोल्ट्री फार्ममधील 8 हजार अशा एकुण 1 लाख 5 हजार 305 पक्षांची विल्हेवाट लावण्यात आली.

आज दि. 9 फेब्रुवारी रोजी शिष पोल्ट्री फार्ममधील 10 हजार 404, पालावाला पोल्ट्रीफार्ममधील 36 हजार, परवेज पोल्ट्रीफार्ममधील 13 हजार 623, आमलीवाला पोल्ट्रीफार्ममधील 24 हजार 760 अशा एकुण 84 हजार 787 पक्ष्यांचे कलींग करण्यात आले आहे.

गेल्या तीन दिवसात चारही पोल्ट्रीफार्ममधील एकुण 2 लाख 21 हजार 492 पक्ष्यांची विल्हेवाट लावण्यात आली आहे.

दरम्यान, काल दि.8 रोजी सहयोग पोल्ट्री, शिष पोल्ट्री, पालावाला पोल्ट्री व न्यू डायमंड पोल्ट्रीफार्ममधील कोंबडयांचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. त्यामुळे या पोल्ट्रीफार्ममधील कोंबडयांचेही कलींगचे काम सुरु करण्यात येणार आहे.

नवापूर तालुक्यातील 26 पोल्ट्री फार्म मध्ये सुमारे 9 लाख पक्षी आहेत. या सर्व पक्षांची शास्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. पक्षांचे खाद्य मोठया प्रमाणावर कुक्कुटपालन व्यवसायिकांनी साठवून ठेवले असते त्याची पूर्णपणे विल्हेवाट लावावी लागेल. सर्वच पोल्ट्री फार्मवर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोल्ट्री फार्मचे अंडी, चिकन, पक्षी , पशुखाद्य आदी साहित्य पोल्ट्री फार्मच्या बाहेर जाणार नाही याची दक्षता घेण्यात येत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com