सारंगखेडा येथील पोलीस कर्मचार्‍याचा मृत्यू

सारंगखेडा येथील पोलीस कर्मचार्‍याचा मृत्यू

सारंगखेडा - Sarangkheda - वार्ताहर :

येथील पोलीस ठाण्यातील कर्मचार्‍याचा पहाटेच्या सुमारास अचानक मुत्यू झाल्याची घटना घडली.

नरेंद्र फुलपगारे (वय 55) असे या कर्मचार्‍याचे नाव आहे.याबाबत पोलीसांनी दिलेली माहितीनुसार, सारंगखेडा पोलीस ठाण्यात एक महिन्यापूर्वी नंदुरबारहून बदली झालेले नरेंद्र फुलपगारे (वय 55) यांना आज दि.30 रोजी पहाटेच्या सुमारास अचानक त्रास होऊ लागला. त्यात त्यांचा मुत्यू झाला.

त्यांना दीर्घ आजार होता. याबाबत पोलीस कर्मचारी रोहिदास सोनवणे यांनी खबर दिली आहे. सदर कर्मचारी धुळे येथील रहिवासी होते.

त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. पुढील तपास पोलिस उप निरिक्षक संदिप पाटील करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com