आडगाव येथे पपईची झाडे कापून फेकली

आडगाव येथे पपईची झाडे कापून फेकली

कोंढावळ - Kondhwal - वार्ताहर :

आडगाव,ता.शहादा येथील शेतकर्‍याच्या गणोर शिवारातील शेतात पपईची 60-70 झाडे कापून फेकल्याने मोठे नुकसान झाले आहे. याबाबत

म्हसावद पोलीसात अज्ञात आरोपींविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आडगाव ता.शहादा येथील शेतकरी राजेंद्र मोरसिंग ठाकरे यांनी गणोर शिवारात चार एकर पपई लावली आहे.

मंगळवारी रात्रीच्या वेळी अज्ञात आरोपींनी लगडलेल्या अवस्थेत असलेली पपईची 60/70 झाडे कापून मोडून फेकून दिली.

हातात आलेले उत्पन्न काही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांमुळे नुकसान करण्याच्या घटना वारंवार घडत आहेत.

यामुळे त्यांचे तीस हजार रूपयांचे नुकसान झाले आहे. म्हसावद, सुलवाडे, धुरखेडा परिसरात शेतकर्‍याच्या पिकांचे नुकसानीच्या घटना वाढत असून शासनाने कडक कार्यवाही करणे आवश्यक झाले आहे.

याबाबत म्हसावद पोलीसात अज्ञात आरोपींविरोधात भादंवि कलम 447, 427 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास एपीआय किरण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ. नामदेव बिर्‍हाडे तपास करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com