बोरद | वार्ताहर - NANDURBAR

तळोदा तालुक्यातील भवर व रेवनागर येथे विना परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री करणार्या दोघां विरोधात तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या ताब्यातील दारू व साहित्य पोलीसांनी नष्ट केले आहे.

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मंगल रामदास पाडवी रा.भवर ता.तळोदा येथे त्याच्या राहत्या घराच्या आडोश्याला लागून गैरकायदा विना पास परमिट शिवाय गावठी हातभट्टीची दारू गाळतांना व आपल्या ताब्यात बाळगून, मातीच्या माठात भरून चोरटी विक्री करतांना आढळुन आला.

तसेच दारू गाळण्यासाठी उपयोगात पडणारे रसायन व साधनांसह मिळुन आला. पोलीसांनी त्यांच्या कडील ४ हजार ७१० रु रकमेची दारू व साहित्य नष्ट करण्यात आले. पो.ना. विशाल महेंद्र नागरे यांच्या फिर्यादीवरून तळोदा पोलीस ठाण्यात मंगल रामदास पाडवी विरूध्द महा.दारू कायदा कलम ६५ ई प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पुढील तपास पो.नी नंदराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे कॉ. महेंद्र जाधव हे करीत आहे.

तसेच दुसर्या घटनेत नान्या पाश्या पावरा रा.रेवानगर ता.तळोदा येथे एका घराच्या आडोश्याला लागून गैरकायदा विना पास परमिट शिवाय गावठी हातभट्टीची दारू आपल्या ताब्यात बाळगून, मातीच्या माठात भरून चोरटी विक्री करताना मिळुन आला.

त्यांच्या कडील १ हजार २०० रु रकमेची दारू नष्ट करण्यात आली. पो.कॉ.दिलीप लोटन पावरा यांच्या फिर्यादी वरून तळोदा पोलीस ठाण्यात नान्या पाश्या पावरा विरूध्द महा.दारू कायदा कलम ६५ ई प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पो.हे कॉ.सुनील मोरे हे करीत आहे.