विवाहीतेच्या छळ प्रकरणी पतीसह चौघांविरूध्द गुन्हा

विवाहीतेच्या छळ प्रकरणी पतीसह चौघांविरूध्द गुन्हा

म्हसावद Mhasavad। वार्ताहर

फत्तेपुर,ता.शहादा येथील माहेर असलेल्या विवाहीतेस Married भुसावळ Bhusaval येथे पतीसह सासरच्या मंडळीकडून शारिरीक व मानसिक त्रास Physical and mental distress दिल्याने सासरच्या चार जणांविरोधात म्हसावद पोलीसात police गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस संत्रांनुसार. फत्तेपुर,ता.शहादा येथील माहेर असलेली विवाहीता शगुपताबी आसीफखान कुरेशीहीने दिलेल्या फिर्यादीनुसार असे की,संशयीत आरोपी पती असीफखान सलिमखान कुरेशी, सासरे सलिमाखान बशीरखान कुरेशी, दिर तोहसिबखान सलिमखान कुरेशी सर्व रा.भुसावळ, मिल्लत नगर मशिद जवळ जि.जळगांव यांनी लग्न झाल्यानंतर 2019 ते आतापर्यंत वेळोवेळी भुसावळ मिल्लत नगरमध्ये सासर येथे फिर्यादी ही आरोपीतांना आवडत नाही व फिर्यादीस वेळोवेळी शारिरीक मानसिक छळ करुन उपाशी ठेवुन वाईट वाईट शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली यावरून म्हसावद पोलीसात भादंवि कलम 498 (अ), 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ फुलपगारे ,सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब पावरा करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com