गोवशांच्या पालनपोषणासाठी तस्करांकडून दीड लाख रुपये घेण्याचे न्यायालयाचे आदेश

 गोवशांच्या पालनपोषणासाठी तस्करांकडून दीड लाख रुपये घेण्याचे न्यायालयाचे आदेश

मोदलपाडा, Modalpada ता.तळोदा वार्ताहर

जुलै महिन्यात तळोदा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जवळून कत्तलीसाठी जाणार्‍या गुरांचे वाहन (Cattle vehicles) पोलिसांनी जप्त करण्यात येवून त्यातील 36 गोवंश पालन पोषणासाठी चौपाळे ता.नंदुरबार येथील गो शाळेत देण्यात आली आहेत. याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा (crime) दाखल करण्यात आला होता. परंतू गुन्हा दाखल असलेल्या व्यक्तींनी हे गोवंश परत मिळण्यासाठी न्यायालयात ( court )अर्ज करण्यात आला होता. मात्र हा अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला असून उलटपक्षी अर्जदारांकडून संबंधीत गोवंशच्या पालन पोषणासाठी (rearing cows) 1 लाख 58 हजार रुपये देण्याचे आदेश दिले आहेत. या निकालामुळे गोवंश तस्करांमध्ये (Beef smuggler) खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, दि.18 जुलै रोजी तळोदा शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवाराजवळून एका वाहनातून 36 गुरे नेण्यात येत असल्याची खबर पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी हे गोवंश कत्तलीसाठी घेऊन जात असल्याची खात्री पटल्यानंतर वाहनासह सुमारे 7 लाख रुपयांचे गोवंश जप्त केले होते. याप्रकरणी व्यापारी रियाजखा रज्जाकखा कुरेशी रा.तळोदा व रहेमान कुरेशी रा.अक्कलकुवा यांच्या विरोधात तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र या व्यापार्‍यांनी सदर गोवंश परत मिळवण्यासाठी न्यायालयात अर्ज केला होता. तथापि न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळून लावून याउलट अरिहंत गोशाळा चौपाळा या संस्थेस गोवंशाच्या संगोपनापोटी दोनशे रुपये प्रतिदिन, प्रति गोवंश या प्रमाणे 1 लाख 58 हजार चारशे रुपये देण्याचे आदेश दिले आहेत. यापुढेही याप्रमाणेच संस्थेला खर्च देण्यात यावा असे आदेशात नमूद केले आहे. याप्रकरणी कसूर केले तर महसूल वसुली प्रक्रियेनुसार दंड ठोठावण्यात येईल, असे आदेश देण्यात आले आहेत. न्यायालयाच्या या आदेशाने गोवंश तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे. संस्थेतर्फे अ‍ॅड. सचिन राणे यांनी काम पाहिले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com