नंदुरबार । प्रतिनिधी Nandurbar

नंदुरबार जिल्ह्यात कोरोनाने कहर केला असून दिवसेंदिवस कोरोना रूग्णांमध्ये वाढ होतांना दिसत आहे. काल दिवसभरात 17 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. गेल्या दोन दिवसात कोरोनामुळे 31 जणांचा बळी गेला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 344 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर सध्या घडीला 7 हजार 717 अॅक्टीव्ह रूग्ण आहेत.

नंदुरबार जिल्ह्यात मार्च महिन्यापासून कोरोनाचा उद्रेक वाढला असून मार्च महिन्यात सुमारे 9 हजाराच्यावर जणांना कोरोनाची लागण झाली. त्यातही काही दिवसपासून नंदुरबार जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. नंदुरबार जिल्ह्यात आज 17 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. दरम्यान काल कोरोनामुळे 14 जणांचा बळी गेला होता.

दोन दिवसातच 31 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने चिंता अधिक वाढली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 344 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यात नंदुरबार तालुक्यातील 148, शहादा तालुक्यातील 116, तळोदा तालुक्यातील 40, नवापूर तालुक्यातील 30, अक्कलकुवा तालुक्यातील 5 व धडगांव तालुक्यातील 5 रूग्णांचा समावेश आहे.

दरम्यान सध्या घडीला नंदुरबार जिल्ह्यात 7 हजार 717 अॅक्टीव्ह रूग्ण आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 20 हजार 848 रूग्ण आढळून आले आहेत तर 12 हजार 784 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहे. सायंकाळपर्यंत आलेल्या अहवालामध्ये 260 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता.