करोनाने गाठली हजारी ; 61 नवे रुग्ण

करोनाने गाठली हजारी ; 61 नवे रुग्ण

नंदुरबार - Nandurbar - प्रतिनिधी :

नंदुरबार जिल्हयात आज तब्बल 62 कोरोना रुग्ण आढळून आल्याने एकुण रुग्णांची संख्या आता 1 हजार 1 झाली आहे. दरम्यान, सहा जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

नंदुरबार जिल्हयात आज तब्बल 62 कोरोना रुग्ण आढळून आल्याने एकुण रुग्णांची संख्या आता 1 हजार 1 झाली आहे. यापैकी 588 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 48 रुग्णांचा मृत्यू झाला असून 363 रुग्णांवर सध्या कोविड कक्षात उपचार सुरु आहेत. 105 अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. आज सायंकाळी 7 वाजता आलेल्या 225 अहवालांपैकी 62 व्यक्तींचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.

यात नंदुरबार शहरासह तालुक्यातील 23, शहादा तालुक्यातील 19, तळोदा येथील 14, नवापूर येथील 3, धडगाव येथील एक, शिरपूर तालुक्यातील तलारी येथील एक, निजामपूर येथील एका रुग्णाचा समावेश आहे. जिल्हयातील ग्रामीण भागांमध्ये कोरोनाचा फैलाव मोठया प्रमाणावर होत असल्याने चिंतेची बाब ठरत आहे.

दरम्यान, आज सहा जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यात नंदुरबार शहरातील तीन, रनाळे ता.नंदुरबार, वाणीगल्ली तळोदा व शिंदखेडा येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. त्यामुळे एकुण कोरोनामुक्त रुग्णांची संख्या 588 झाली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com