नंदुरबार : जिल्हयात करोना १० रुग्ण
नंदुरबार

नंदुरबार : जिल्हयात करोना १० रुग्ण

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

नंदुरबार - Nandurbar - प्रतिनिधी :

नंदुरबार जिल्हयात आज पुन्हा कोरोनाचे दहा रुग्ण आढळून आले आहेत. यात नंदुरबारातील सात व शहादा येथील तीन रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, काल दाखल झालेल्या गुरुनानक सोसायटीतील रुग्णाचा सायंकाळी मृत्यू झाला.

नंदुरबार जिल्हयात कोरोना रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होतांना दिसत आहे. गेल्या आठवडयापासून दररोज कोरोनाचे रुग्ण आढळत असल्याने रुग्णांची एकुण आकडेवारी 314 वर पोहचली आहे. आज पुन्हा जिल्हयात दहा रुग्ण आढळून आले आहेत. यात नंदुरबार येथील सात तर शहादा येथील तीन रुग्णांचा समावेश आहे.

आज सायंकाळी 6.30 वाजेच्या सुमारास दोन व्यक्तींचे कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आले. यात नंदुरबार येथील मुजावर मोहल्ला येथील 65 वर्षीय पुरुष व शहादा येथील कुंभारवाडयातील 74 वर्षीय पुरुषाचा समावेश होता.

सायंकाळी 7.30 वाजेच्या सुमारास आठ रुग्णांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. यात नंदुरबार येथील रायसिंगपुरा येथील 33 वर्षीय पुरुष, 45 वर्षीय महिला, 19 वर्षीय तरुणी, चौधरी गल्लीतील 60 वर्षीय महिला, देसाईपुरा येथील 70 वर्षीय महिला तर शहादा येथील पतंजली नगर येथील 78 वर्षीय महिला, 60 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.

दरम्यान, नंदुरबार येथील गुरुनानक सोसायटीतील रहिवासी 72 वर्षीय पुरुषाला काल जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या रॅपिड अँटीजेन चाचणीचा अहवाल निगेटीव्ह आला होता. आजच्या चाचणीचा अहवाल पॉझिटीव्ह आला. आज सायंकाळी त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनाने मृत्यू झालेल्यांची संख्या 16 झाली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com