कंटेनरची कारला धडक

शहादा येथील एकाच कुटुंबातील पाच जण जखमी
कंटेनरची कारला धडक

शहादा Śahādā| ता.प्र.

शहरातील सोनार गल्लीत राहणारे कुटुंब नंदुरबारकडे जात असतांना प्रकाशा रोडवरील राजरंग हॉटेलच्या Rajrang Hotel पुढे समोरून येणार्‍या कंटेनरने कारला जबर ठोस Container car accident दिल्यामुळे कारमध्ये बसलेल्या सोनार कुटुंबातील पाचही लोक जखमी Injured झाले आहेत.जखमींना तातडीने खाजगी रुग्णालयात private hospital दाखल करून उपचार Treatment सुरू आहे.

दरम्यान कंटेनर चालकास वाहनासह अटक करण्यात आली आहे.अपघाताची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक दीपक बुधवंत यांनी घटनास्थळी जाऊन माहिती घेतली.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, शहरातील सोनार गल्लीत राहणारे सोनार व्यवसायिक प्रसाद सतिष सोनार (वय ५२) त्यांच्या, पत्नी रक्षा प्रसाद सोनार (वय ४८), आई भारतीबाई सतिष सोनार (वय ७२) मुलगा दश प्रसाद सोनार व मुलगी दर्शिका प्रसाद सोनार हे सोनार कुटुंब सकाळी पावणे बाराच्या सुमारास नंदुरबारकडे वाहन क्रमांक( एम. एच. ०४, सी. झेड. १७९४)या वाहनाने निघाले. प्रकाशा रस्त्याकडे कार जात असताना राजरंग हॉटेल च्या लगत प्रकाशा कडून भरधाव वेगाने येणार्‍या कंटेनर क्रमांक (पी. बी.१३,बी. एफ.९८२७) भरधाव वेगाने येत असताना रस्त्याच्या बाजूला असलेल्या पोकल्यानला वाचवत असताना कंटेनर चालकाने समोरून येणार्‍या कारला धडक दिल्यामुळे कारमधील प्रत्येकाच्या डोक्याला, पायाला, हाताला जबर मार लागलेला आहे.

यात भारतीबाई सतीश सोनार यांच्या डोक्याला जबर मार लागला आहे. तसेच प्रसाद सोनार यांच्या पत्नी रक्षाबाई ,मुलगा दश व मुलगी दर्शिका यांच्या डोक्याला, हाताला मार लागला आहे. तर प्रसाद सोनार यांच्या उजव्या पायाला जबर मार लागल्यामुळे फॅक्चर व डोक्याला मार लागला आहे.सुदैवाने जिवीतहाणी झाली नाही.अपघातानंतर या ठिकाणी मोठी गर्दी झाली.

फलक लावणे आवश्यक

शहादा प्रकाशा रोड नुकताच तयार झाल्याने या रोडवर दिवसाकाठी शेकडो वाहनं ये-जा करीत असतात भरधाव वेगाने वाहन वेगाने चालवीत आहेत अनेक वाहन चालक कुठल्याही गोष्टीची न परवा करता बेभान होऊन वाहन चालवत असल्याने अपघाताचे सत्र या रस्त्यावर सुरू आहे रस्त्याच्या आजूबाजूला संरक्षण कठडे नाहीत कुठेही नियंत्रण कक्ष किंवा रस्ते वाहतुकीचे नियमाचे पालन करणारे फलक नसल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढू लागले आहे. केंद्र शासनाकडून तयार करण्यात आलेल्या रस्त्यावर रस्त्याचा नियमांचे फलक लावण्याची मागणी आता नागरिकांकडून होत आहे .

मोठा दुर्घटना टळली

समोरून वाहन येत असल्याचे लक्षात येतात प्रसाद सोनार यांनी आपली कार हळू करून घेतली. अन्यथा मोठी दुर्घटना घटना घडली असती. अपघात घडताच प्रसाद सोनार यांनी शहरातील आपल्या नातेवाईकांना, मित्रांना भ्रमणध्वनी ने संपर्क करून घटनेची माहिती देताच शहरातील सोनार गल्लीतील मित्र, नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेऊन प्रसाद सोनार व त्यांच्या कुटुंबीयांना खाजगी रुग्णालयात तातडीने दाखल केल्यामुळे उपचार सुरू झाला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com