84 हजारांचा गांजा जप्त
नंदुरबार

84 हजारांचा गांजा जप्त

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

नंदुरबार - Nandurbar - प्रतिनिधी :

नंदुरबार तालुक्यातील चौपाळे फाटयाजवळ टोयाटो कंपनीच्या कारमधून तस्करी होणारा गांजा पोलिसांनी पकडला. 84 हजार रुपयांच्या 12 किलो गांजा व 7 लाख रुपये किंमतीची टोयाटो कार असा एकुण 7 लाख 84 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी जळगांव येथील एकाविरूध्द नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार दोंडाईचा रस्त्यावरील चौपाळे फाट्याजवळ दि.7 ऑगस्टचा रात्री 12.30 वाजेच्या सुमारास जळगाव येथील कंजरवाडा परिसरातील गोपाल संजय नेतलेकर हा त्याच्या ताब्यातील टोयाटो कंपनीची कार (क्र.एम.एच.19 सिटी 3807) ने जात असतांना पोलीस उपनिरीक्षक कमलाकर चौधरी यांनी वाहनाची तपासणी केली असता त्यात गांजासदृश्य नावाच्या अमली पदार्थ आढळून आला.

पोलीस पथकाने गाडीची झाडाझडती करून 84 हजार रुपये किमतीचा 12 किलो गांजा व 7 लाखाची टोयाटो कंपनीची कार जप्त केली. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक कमलाकर चौधरी यांच्या फिर्यादीवरून संशयित गोपाळ संजय नेतलेकर यांच्याविरुद्ध नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात भादवि कलम एनटीपीसी अ‍ॅक्ट 1985 चे कलम 20 व 22 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संशयितास पहाटे 4.57 वाजता पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक अरविंद पाटील करीत आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com