तळोदा येथे दोन ठिकाणी घरफोडी

आठ लाखाचा ऐवज लंपास
तळोदा येथे दोन ठिकाणी घरफोडी

मोदलपाडा, ता.शहादा | वार्ताहर-ं TALODA

तळोदा येथे दोन ठिकाणी झालेल्या घरफोडीत ७ लाख ९८ हजाराचा ऐवज लंपास झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी अज्ञातांविरूध्द तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तळोदा शहरातील भगवान नगर कॉलनी येथे रतिलाल दगडु मराठे यांचे बंद घराच्या दरवाजाचे कडी कोयंडा व कुलूप तोडून अज्ञात चोरटयांनी आत प्रवेश करत कपाटात ठेवलेल्या लॉकरमधून ५ लाख ६० हजार रोख व १ लाख ८० हजार रूपये किंमतीचे सोन्या चांदीचे दागिने लंपास केले.

याप्रकरणी रतिलाल दगडु मराठे रा.निंभोरा (ता.कुकरमुंडा जि.तापी) यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरटयाविरूध्द तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास सपोनि केदार करीत आहेत.

दुसर्‍या घटनेत तळोदा येथील गिरधर आप्पा नगरात राहणार्‍या गोरख पाटील यांच्या बंद घरात अज्ञात चोरटयांनी दरवाजाच्या कडी कोयंडा व कुलूप तोडून आत प्रवेश करत ५८ हजार रूपये रोख लंपास केल्याची घटना घडली आहे.

याप्रकरणी गोरख रतन पाटील रा.तळोदा यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरटयाविरूध्द तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोसई अभय मोरे करीत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com