शहादा येथे घरफोडी ; अडीच लाखाचा ऐवज लंपास

शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
शहादा येथे घरफोडी ; अडीच लाखाचा ऐवज लंपास

नंदुरबार | प्रतिनिधी - Nandurbar

शहादा येथे रामदेव बाबानगरात अज्ञात चोरटयानी घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश करत २ लाख ३४ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी अज्ञाताविरूध्द शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहादा येथील गौतम जमदाळे रामदेवबाबा नगर (शहादा) यांच्या घरात अज्ञात चोरटयांनी दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश करत बेडरूमधील कपाटाचे लॉकर उघडून त्यातील दिड लाख रूपये रोख व ८४ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे.

याप्रकरणी जितेंद्र भिमराव जमदाळे रा.द्वारकाधीशनगर (शहादा) यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरटयाविरूध्द शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोनि बुधवंत करीत आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com