नंदुरबार। प्रतिनिधी Nandurbar

भाजपाच्या विरोधात असणार्या पक्षांमधील नेत्यांना दबाव तंत्राचा वापर करून ईडीचा गैरवापर करण्यात येत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री ना.जयंत पाटील यांनी नंदुरबार येथे पत्रकार परिषदेत केला.

नंदुरबार शहरातील सेंटमदर टेरेसा स्कूलचा प्रांगणात परिवार संवाद यात्रा निमित्त आयोजित मेळाव्याप्रसंगी ते पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, भाजप पक्षाच्या विरोधात असणार्या नेत्यांवर ईडीमार्फत चौकशी नेमूण दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शरद पवार यांनाही गुंतवण्याचा प्रयत्न झाला. त्यावेळपासून ईडीचा गैरवापर वाढला आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील सिंचनाचे प्रश्नमार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार आहे. नंदुरबार जिल्ह्यात प्रमुख विभागात अधिकारी नसल्याने विकास काहीशा खुंटला आहे. त्यामुळे अधिकार्यांची लवकर नेमणूक करण्यात येईल. शरद पवार आयसीआयचे अध्यक्ष असतांना त्यांनी क्रिकेटमध्ये मोठी क्रांती केली. मात्र सदाभाऊ खोत यांनी त्यांच्याबद्दल जे वक्तव्य केल. त्याला आम्ही कवडीचीही किंमत देत नाही. सदाभाऊ खोत यांच्या विचार करण्याची क्षमता मर्यादीत आहे.

मागील पाच वर्षात पंतप्रधान सिंचाई योजना व बळीराजा सिंचाई योजना यावरच काम झाल्याने जिल्ह्यातील बरेच प्रकल्प रखडले आहे. त्यामुळे येत्या काळात सर्वच योजनांना गती देण्याचे काम करण्यात येईल. उत्तर महाराष्ट्रातील भाजपातून राष्ट्रवादीत आलेले ज्येष्ठ एकनाथराव खडसे यांच्यावर लवकरच पक्षाची मोठी जबाबदारी देण्यात येणार आहे. असेही ना.पाटील म्हणाले, यावेळी विधान सभेच्या सभापतीवरून तिघ पक्षात भांडण होवून हे सरकार पडेल असे विरोधी पक्षनेते ना.देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. त्यांचाही यावेळी समाचार घेत देवेंद्र फडणवीस यांनी अनेक वर्ष विरोधी पक्षनेते पद भूषविले आहे. त्यामुळे भविष्यातही तेच विरोधी पक्षनेते रहावे. अशी आमची मनापासून इच्छा आहे. असे ना.जयंत पाटील म्हणाले.

भिलोरी भाषेत जयंत पाटील यांचा संवाद

नंदुरबार येथे आढावा बैठकीत प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी चक्क आदिवासी बांधवांच्या स्थानिक भिलोरी भाषेत संवाद साधत सर्वांची मने जिंकली.

राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा चौदाव्या दिवशी नंदुरबार जिल्हयात पोचली आहे. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे नंदुरबार येथे आदिवासी बांधवांशी आपल्या मराठी भाषेत संवाद साधत होते मात्र ही भाषा आदिवासी बांधव आणि महिलांना समजताना कठीण जात असल्याने स्थानिकांच्या मदतीने जयंत पाटील यांनी आदिवासी बांधवांच्या स्थानिक भिलोरी भाषेला हात घातला आणि त्या भाषेतूनच संवाद साधला.जयंत पाटील यांनी आपल्या स्थानिक भिलोरी भाषेत संवाद साधल्याने तिथल्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पाहायला मिळाला. यावेळी रूपाली चाकणकर, मेहबूब शेख, जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजित मोरे, सागर तांबोळी, सिताराम पावरा , मधुकर पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थीत होते.

यावेळी शहादा येथील एमआयएमच्या नगरसेवकांनी व अन्य पदाधिकार्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला.