नवापूर । श.प्र. Navapur

बर्ड फ्लूच्या पार्श्वभुमीवर आतापर्यंत 5 लाख 10 हजार 210 पक्षी तर 18 लाख 77 हजार 845 अंडी नष्ट करण्यात आली आहेत.

तालुक्यातील चोविस पैकी बावीस पोल्ट्री फार्मच्या बर्डफ्लुबाधित कोंबड्यांचे सलग सहाव्या दिवशी कलिंग करण्यात आले. आज बर्डफ्लू प्रभावी दोन पोल्ट्रीतील 1 लाख 30 हजार 754 कुक्कुट पक्षी नष्ट करण्यात आले आहेत.

यात सकीस्मा पोल्ट्रीतील 1 लाख 7 हजार 789 तर जनता पोल्ट्री मधील 22 हजार 965 पक्षी नष्ट करण्यात आले आहेत. 24 पैकी 22 पोल्ट्री फार्ममधील पोल्ट्रीतील सर्व पक्षी नष्ट करण्यात आले.

आतापर्यंत 5 लाख 10 हजार 210 पक्षी नष्ट करण्यात आले आहेत. तर 18 लाख 77 हजार 845 अंडी नष्ट करण्यात आली असल्याची माहिती तहसीलदार मंदार कुलकर्णी यांनी दिली.