<p><strong>नंदुरबार । प्रतिनिधी - Nandurbar</strong></p><p>राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अॅड.के.सी.पाडवी यांच्या हस्ते खडकी दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी 5 लाख रुपयाचे धनादेशाचे वितरण करण्यात आले.</p>.<p>देण्यात आलेल्या अर्थसहाय्याचा उपयोग मुलांच्या शिक्षणासाठी करावा, त्यासाठी रक्कम बँकेत ठेवावी, असे आवाहन पालकमंत्र्यांनी यावेळी केले. जखमी झालेल्या लहान मुलांच्या प्रकृतीची त्यांनी चौकशी केली. या मुलांच्या प्रकृतीची आरोग्य यंत्रणेने काळजी घ्यावी असे निर्देश त्यांनी दिले.</p>