आणखी एक बायोडिझेल पंप सिल

आणखी एक बायोडिझेल पंप सिल

9 हजार लिटर व्हाईट ऑईल आढळले

नवापूर Navapur । श.प्र.

तालुक्यातील बेडकी शिवारात Bedki Shivara सुरु असलेल्या अवैध बायोडिझेल पंपवर Invalid biodiesel pump पुरवठा विभागाने supply department कारवाई Action केली असून 9 हजार लिटर व्हाईट ऑईलसह White oil इतर साधनसामुग्री याठिकाणी आढळून आले आहे.

नवापूर शहरालगत बेडकी नाका परिसरात हॉटेल उर्वशीलगतच्या मोकळया जागेत अवैधरित्या बायोडिझेल विक्री होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार पुरवठा विभागामार्फत कारवाई करण्यात आली. सदर कारवाई दरम्यान दोन पत्र्यांचे शेड आढळून आले असून एकामध्ये दोन रिडींग युनिट संच व दुसर्‍या शेडमध्ये तीन प्लास्टिकच्या टाक्या, 1 एच.पी. मोटर, 1 लोखंडी टाकी व पाईप आढळून आले.

टाक्यांमध्ये अंदाजे 9 हजार लिटर इतके एस.एन.-70 व्हाईट ऑईल आढळून आले. दोन्ही शेडचा पंचनामा करुन सीलबंद करण्यात आले आहेत. स्थानिक माहितीनुसार सदर व्यवसाय फिरोज लाखाभाई आगाम हे करत होते.

प्रस्तुत कारवाईत व्हाईट ऑईलचे नमुने घेण्यात आले असून ते पुढील तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहेत. प्रयोगशाळेच्या अहवालानंतर पुढील कारवाई करण्यात येईल.

या कारवाईत पुरवठा विभागाचे मिलिंद निकम, दिलीप पाडवी, अक्षय लोहारकर हे कर्मचारी सहभागी होते. पोलीस विभागामार्फत पोलीस उपनिरिक्षक नासिर पठाण हजर होते. याबाबतची माहिती तहसिलदार मंदार कुलकर्णी यांनी दिली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com