जिल्हयात आणखी आढळले ६६ पॉझिटिव्ह रुग्ण
नंदुरबार

जिल्हयात आणखी आढळले ६६ पॉझिटिव्ह रुग्ण

बाधितांचा आकडा ७०० पार

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

नंदुरबार - Nandurbar - प्रतिनिधी :

नंदुरबार जिल्हयात आज तब्बल 66 कोरोनाबाधीत रुग्ण आढळून आले. ही आकडेवारी आतापर्यंत सर्वाधिक आहे. त्यामुळे एकुण रुग्णांची संख्या 718 झाली आहे. दरम्यान, तीन जणांचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला. यात दोन महिलांचा समावेश आहे.

नंदुरबार जिल्हयात आज कोरोनाचे तब्बल 66 रुग्ण आढळून आले आहेत. यात नंदुरबार शहरातील 31 तसेच तालुक्यातील खोंडामळी येथील 7, शनिमांडळ येथील 4, करजकुपा येथील 4, रनाळे, विखरण व तलवाडे येथील प्रत्येकी 1, शहादा येथील 5, सारंगखेडा ता.शहादा येथील 9, तळोदा येथील 2 रुग्णांचा समावेश आहे. यामुळे रुग्णांची संख्या 718 वर पोहचली आहे. आज आढळलेले 66 रुग्णसंख्या ही जिल्हयातील सर्वाधिक रुग्ण संख्या ठरली आहे.

दरम्यान, आज तिघा कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला. यात नंदुरबार येथील देसाईपुरा येथील 71 वर्षीय पुरुष, दहिंदुले ता.नंदुरबार येथील 60 वर्षीय महिला व शनिमांडळ ता.नंदुरबार येथील 65 वर्षीय महिलेचा समावेश आहे. त्यामुळे कोरोनाबळींची संख्या 39 झाली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com