कोविडचा उपचार करणार्‍या सर्व दवाखान्यांना परवानगी द्या

माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांची मागणी
कोविडचा उपचार करणार्‍या सर्व दवाखान्यांना परवानगी द्या

नंदुरबार | प्रतिनिधी- nandurbar

कोविडचा उपचार करणार्‍या सर्व दवाखान्यांना परवानगी देण्याची मागणी माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी जिल्ह्याधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांना निवेदनाव्दारे केली आहे. जिल्हधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्हा प्रशासनाकडून मंजुरी घेऊन कोविडचा रुग्णांचा उपचार करावयाचा असतो. हा सर्वसाधारण नियम आहे . परंतु कोविड रुग्णांची संख्या बघता नंदुरबार, शहादा व इतर शहरांमध्ये परवानगी न घेता कोविड उपचार करणार्‍या दवाखान्यांची संख्या सुध्दा जास्त आहे.


शासनाच्या नविन नियमावली प्रमाणज्या दवाखान्यांना जिल्हा प्रशासनाने मंजुरी दिली असेल त्याच दवाखान्यामधील रुग्णांना जिल्हा प्रशासनातर्फे रेमडीसीवर इंजेक्शन पुरविले जातील हा नियम एक प्रकारे विनापरवानगीने उपचार करणार्‍या रुग्णांवरती अन्याय आहे.

विनापरवानगीचे दवाखाने जरी असले तरी ते कोविड रुग्णांवर उपचार करीत आहेत ही वस्तु स्थिती आहे.आणि म्हणून या जे दवाखाने कोविड रुग्णांवरती उपचार करीत असतील त्या सर्व दवाखान्यांना सरसकटपणे पनवानगी दयावी . म्हणजेच त्या दवाखान्यात उपचार घेणार्‍या रुग्णांचे हाल होणार नाहीत .

नंदुरबार मध्ये परवानगी नसलेले दवाखाने उदा . दागा हॉस्पीटल , चरक हॉस्पीटल ई . तसेच शहादा, नवापुर, तळोदा, अक्कलकुवा, खापर इ. येथील सर्व कोविड उपचार करणार्‍या दवाखान्यांना कोविड रुग्णांवर उपचार करणाची परवानगी दयावी तसेच रेमडीसीवर इंजेक्शन सुध्दा उपलब्ध करुन दयावे अशी मागणी निवेदानाव्दारे करण्यात आली आहे. निवेदनावर माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांची स्वाक्षरी आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com