केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी कायद्याच्या निषेधार्थ विविध संघटनांतर्फे आंदोलन

केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी कायद्याच्या निषेधार्थ विविध संघटनांतर्फे आंदोलन

नंदुरबार Nandurbar। प्रतिनिधी

सत्यशोधक शेतकरी सभा (Satyashodhak Shetkari Sabha), सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा (Satyashodhak Gramin Kashtakari Sabha) आणि सत्यशोधक महिला सभेतर्फे (Satyashodhak Mahila Sabha) आज शेतकरी विरोधी कायदा (against the anti-farmer law) सह विविध मागण्यांसाठी तहसील कचेरीबाहेर (Tehsil office) आंदोलन करण्यात आले. यावेळी सत्यशोधक संघटनेतर्फे नायब तहसीलदार बी.ओ.बोरसे (Deputy Tehsildar B.O. Borse) यांच्यामार्फत जिल्हाधिकार्‍यांसह पंतप्रधानांना निवेदन (Statement)पाठविण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की केंद्र सरकारने पारित केलेले शेतकरीविरोधी तीन कायदे रद्द करून शेतकर्‍यांच्या हितासाठी शेतकर्‍यांच्या दुधासह प्रत्येक मालाला हमी भाव देणारा एमएसपी कायदा करा यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला दहा महिने पूर्ण होत असून आतापर्यंत 600 पेक्षा जास्त शेतकर्‍यांनी बलिदान दिलेले आहे. केंद्र सरकारने मोदी शहा हिटलरवादी सरकार शेतकर्‍यांना मवाली, खलिस्तानवादी, नकली किसान अशा अनेक उपमा देऊन शेतकर्‍यांची थट्टा करीत असल्याचा आरोप निवेदनाद्वारे केला आहे.

राज्यघटनेला न जुमानता राज्याच्या अखत्यारीतील कृषी विषयावर केंद्र सरकारने हे कायदे केले. त्यानंतर नवीन शिक्षण धोरण व कामगार विरोधी चार कायदे आणले. आदिवासी वन हक्क कायदा व मनरेगाची रोजगार हमी कायद्याची अंमलबजावणी थांबली मध्यंतरी कार्पोरेट कंपन्यांसाठी जंगल देण्याचे धोरण आणण्याचाही प्रयत्न झाला.

शेतीमालाला किमान आधारभूत किमतीचा कायदा एमएसपी गॅरेंटी कायदा करायला केंद्र सरकारला वेळ नाही म्हणून शेतकर्‍यांचा देशव्यापी संघर्ष सुरू झाला. अनेकदा लाठीचार्ज अश्रूधूर नळकांडी पाण्याचा फवारा अशा अनेक प्रकारे दडपशाही सहन करून शेतकर्‍यांच्या आंदोलनाला -दहा महिने पूर्ण होत आहेत. म्हणून संयुक्त किसान मोर्चा ने पुकारलेल्या भारत बंदला सत्यशोधक शेतकरी संघटनेने पाठिंबा दिला असून निदर्शने करीत सहभाग नोंदविला आहे या निवेदनावर सत्यशोधकचे विक्रम गावित, करणसिंग कोकणी, लिलाबाई वळवी, काशिनाथ कोकणी, बाबूराव ठाकरे, किसन रवी, राजेश वळवी, मंगल वळवी, फत्तेसिंग कोकणी, रंग्या कोकणी, जमुना ठाकरे आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत

नंदुरबार काँग्रेस

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या नंदुरबार जिल्हा शाखेतर्फे सोमवारच्या देशव्यापी आणि राज्यव्यापी बंदला पाठिंबा देत केंद्र शासनाच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने करण्यात आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस नंदुरबार जिल्हा शाखेने म्हटले आहे की केंद्रातील मोदी सरकारने देशातील सर्व सरकारी यंत्रणा ताब्यात घेऊन देश बरबाद करण्याचा घाट घातला आहे. भाजपाच्या हुकूमशाही राजवटीने आणलेले शेतकरीविरोधी तीन काळया कायद्यामुळे संपूर्ण देशाची आर्थिक परिस्थिती ढासळली आहे.

हे कायदे त्वरित मागे घ्यावे म्हणून जगाचा पोशिंदा गेल्या काही महिन्यापासून दिल्लीत ठाण मांडून बसलेला आहे. या जुलमी सरकारला त्याची कीव येत नाही उलट त्यांचा क्रूर पद्धतीने छळ केला जात आहे असा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे . निवेदनावर भास्कर सोनवणे. जिल्हा सरचिटणीस पंडित पवार. शहराध्यक्ष ईकबाल खाटीक. काँग्रेस सेवादलचे इजाज बागवान. हाजी असलम, राजू पाटील, रऊफ शाह आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत

प्रहार जनशक्ती संघटना

कृषी कायद्यामुळे देशातील शेतकरी देशोधडीला लागला. केंद्र शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे देशात शेतकरी आत्महत्या आणि बेरोजगारी वाढली या निषेधार्थ प्रहार जनशक्ती पक्षाच्या प्रहार शेतकरी संघटनेतर्फे नंदुरबार जिल्ह्यात शेतकरी विरोधी कायद्याच्या अध्यादेशाची होळी करण्यापूर्वी पोलिसांतर्फे प्रहार शेतकरी संघटनेच्या पदाधिकार्‍यांना अटक करण्यात आली.

याबाबत जिल्हाधिकार्‍यांमार्फत पंतप्रधानांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे की, देशातील शेतकरी बांधवांवर कृषी कायदे लादून अन्याय केला. शेतकरी बांधवांना कर्जमुक्ती दीडपट हमीभाव याचे दिलेले वचन पाळले नाही. पेट्रोल डिझेल गॅस आणि जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडले ते आटोक्यात आणण्याची शेतकरी शेतमजूर सुशिक्षित बेरोजगार यांना आतंगवादी ठरवीत असल्याचा आरोप निवेदनाद्वारे करण्यात आला.

2014 मध्ये दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न करता शेतकर्‍यांची फसवणूक केली. शेतकरी कर्जमुक्ती शेतमालाला उत्पादन खर्चावर हमीभाव न देता राष्ट्रीयकृत बँकांनी शेतकर्‍यांना वेठीस धरले कामगार विरोधी कायदे, नवीन आणत असलेले वीज विधेयक मागे घ्यावे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेत मजुरांचे दिवस व मजुरीत वाढ करावी याकरिता भारत बंद च्या आंदोलनाला समर्थन देण्यात येत आहे.

शेतकरी विरोधी कायदा त्वरित मागे न घेतल्यास केंद्र सरकारला गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला. आंदोलनापूर्वी शेतकरी संघटनेच्या पदाधिकार्‍यांना उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे यांनी ताब्यात घेतले. या निवेदनावर जिल्हाध्यक्ष बिपिन पाटील, प्रताप पाटील, रवींद्र वळवी, योगेश पाटील आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.

नवापूर

नवापूर तहसील कार्यालयात सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेच्या वतीने केंद्र सरकारच्या कृषी कायद्याच्या विरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला दुर्लक्षित करत कायदे रद्द करण्याविरोधात कुठलेही ठोस पावले न उचलल्याने केंद्र सरकारचा निषेध नोंदवत आंदोलन करण्यात आले. नवापूर तहसील कार्यालयाच्या आवारात झालेल्या आंदोलनात सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी संघटनेचे कॉ.रामसिंग गावित, कॉ.जगन गावित, कॉ.रणजीत गावित, कॉ. दिलीप गावित, कॉ.आर.टी.गावित, कॉ.मंगल गावित, कॉ.जालमसिंग गावित, कॉ.झेल्या गावित, कॉ.रमेश गावित आदींचा सहभाग होता.

यावेळी सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी संघटनेच्यावतीने केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. केंद्र सरकारने पारित केलेले तीन कृषी कायदे रद्द करावे, वाढती महागाई कमी करावी, पेट्रोल डिझेल खाद्यतेलावरील वाढते दर कमी करण्यात यावे यासह विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार मंदार कुलकर्णी यांना संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी दिले. यावेळी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पोलिस निरीक्षक बाळासाहेब भापकर यांच्या मार्गदर्शनखाली उपनिरीक्षक नासिर पठाण, पोहेकॉ निजाम पाडवी,चंद्रशेखर चौधरी, विकास पाटील,संजय ठाकुर यांनी चोख बंदोबस ठेवला होता.

शेतकरी संघटना, नवापूर

नवापूर तालुक्यातील सर्व शेतकरी संघटना व सर्व राज्यकिय पक्षाच्या पदधिकार्‍यांनी तहसिलदार मंदार कुलकर्णी, पोलिस निरीक्षक बाळासाहेब भापकर यांना याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या 10 महिन्यापासून शेतकरी दिल्लीच्या अवतीभवती तळ ठोकून आहे. परंतू शेतकर्‍यांच्या मागणीकडे केंद्र सरकारने लक्ष घातलेले नाही. केंद्र सरकार म्हणते आम्ही शेतकर्‍यांच्या पाठीशी आहोत मोठमोठया उद्योगपतींशी चर्चा करण्याची वेळ केंद्र सरकारकडे आहे.

परंतू या देशाला अन्न पुरविणारे शेतकरी यांच्या हिताचे निर्णय करण्यासाठी केंद्र सरकारकडे वेळ नाही. संपूर्ण देशाचे या आंदोलनाकडे लक्ष लागून आहे. सरकारच्या निती आणि मतीपेक्षा शेतकर्‍यांच्या शेती आणि मातीला किती मोल आहे हे सत्ता बदलेपर्यंत समजायला वेळ लागेल. केंद्र सरकारने शेतकर्‍यांच्या हिताचा निर्णय करण्यासाठी दहा महिन्यांपर्यंत शेतकर्‍यांना आंदोलन करण्यास भाग पाडलेले आहे.

अजुन किती वेळ आंदोलन सुरु राहील सांगता येत नाही. केंद्र सरकारने शेतकरी विरोधी आणलेले तीन कृषि कायदे रद्द करावे.तसेच शेतकर्‍यांना उत्पादन खर्चाचा दिडपट हमी भाव मिळावा, खाजगीकरणाची निती बंद करावी, पेट्रोल, डिझेल व गॅस आदींच्या किमती कमी करुन नागरीकांना दिलासा द्यावा, वीज दुरुस्ती विधेयक मागे घ्यावे, महात्मा गांधी रोजगार हमी योजनेत कामाचे दिवस वाढवून शेतमजूरांचे रोजगार हमीचे वेतन दुप्पट करावे, राष्ट्रीयकृत बँकांनी पिक कर्ज देण्यासाठी शेतकर्‍यांच्या सीबी स्कोअर तसेच ज्या शेतकर्‍यांनी ओटीएस योजनेत बँकेचे कर्ज भरले आहेत, त्या शेतकर्‍यांना त्वरीत कर्ज मजूर करावे, दुष्काळग्रस्त भागातील शेतकर्‍यांना आर्थिक मदत तसेच पिक विमाधारक शेतकर्‍यांना पिक विम्याची रक्कम परत मिळावी. कामगार विरोधी कायदे मागे घ्यावेत.

यासाठी संयुक्त किसान मोर्चा व देशभरातील विविध शेतकरी संघटनांनी बंद पुकारुन केंद्र सरकारचा निषेध केलेला आहे. निवेदनावर अखिल महाराष्ट्र आदिवासी विद्यार्थी संघटना नंदुरबार जिल्हाध्यक्ष आर.सी.गावीत, कॉग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष जालमसिंग गावीत, माजी राष्ट्रवादी युवक तालुका अध्यक्ष मनोज वळवी, शेतकरी संघर्ष समिती अध्यक्ष शंकर गावीत, अनिल गावीत, कांतीलाल गावीत, सरपंच बाळू गावीत, बीटीएसचे तालुका अध्यक्ष विजय गावीत, सरपंच ईश्वर गावीत, सरपंच राहुल गावीत, दलपत वसावे, रामा गावीत, नाथु गावीत, दिलीप गावीत, राजु गावीत, सुनिल गावीत, रमेश वसावे आदींच्या सहया आहेत.

नवापूर काँग्रेस

केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याच्या विरोधात विविध शेतकरी संघटनेने पुकारलेल्या भारत बंद आंदोलनास नवापूर तालुका भारतीय राष्ट्रीय कॉग्रेसने पाठींबा दिला आहे. याबाबत तहसिलदार मंदार कुलकर्णी, पोलिस निरीक्षक बाळासाहेब भापकर यांना निवेदन देण्यात आले आहे.

निवेदनावर आ.शिरीषकुमार नाईक, नवापूर तालुका कॉग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष जालमलिंग गावीत, नगराध्यक्षा सौ. हेमलता पाटील, तानाजी वळवी, गटनेता आशिष मावची, माजी नगराध्यक्ष दामू बिर्‍हाडे, माजी नगरसेवक अजय पाटील, विनय गावीत, दिपक वसावे, माजी उपनगराध्यक्ष सोहेल बलेसरीया, जगदीश पाटील, रहेमतखा पठाण, मोहमतजी मुल्ला, मयूर सिंदी, तुराब पठाण, ताहीर पठाण, असद कुरेशी,आदीच्या सह्या आहे.

Related Stories

No stories found.