तळोदा येथे सोनगडवाला परिवाराची आगळी वेगळी रक्षाबांधन

तळोदा येथे सोनगडवाला परिवाराची आगळी वेगळी रक्षाबांधन

मोदलपाडा Modalpada ता.तळोदा । वार्ताहर

आजच्या काळात अनेक कुटुंब Family हे विभक्त Divided होतांना दिसून येत असतात मात्र तळोदा शहरातील सोनगडवाला परिवार Songadwala family हे अपवाद ठरलं आहे. परिवारातील एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल 19 बहिणी व 11 भावंडांचे 19 sisters and 11 siblings कुटुंब हे आपल्या वडिलांच्या वर्षाश्रध्दानिमित रक्षाबंधनाच्या Rakshabandhan पूर्वसंध्येला एकत्र आलेत आणि आपल्या घरामध्येच मोठ्या आनंदाने अनोखा उत्सव साजरा केला असून या सोनगडवाला परिवाराची या रक्षाबांधनाची तळोदा शहरात चर्चा होत आहे.

तळोदा येथील स्व. नवणीतलाल हरकलाल वाणी (सोनगडवाला) यांचे 20 ऑगस्ट ला वर्षश्राद्ध होते. या निमित्ताने यांच्या परिवारातील एकूण 19 बहिणी व 11 भावंडे एकत्र आले व दुसर्‍या दिवशी म्हणजे 21 ऑगस्ट च्या दिवशी या सर्व बहिणींनी आपल्या भावंडांना रक्षाबंधनाचा उत्सव अत्यंत आनंदात साजरा केला. या एवढ्या मोठ्या परिवारांचे एकमेकांशी प्रेमाचे ,जीवाभावाचे संबंध आहेत. भाऊ बहिणींनी रक्षाबंधनाच्या पावन दिवशी राखी बांधली,असा आदर्श समाजा पुढे ठेवणारे अशे हे नवनितलाल सोनगड वाला परिवार हे पहिलेच कुटुंब म्हटल्यास वावगे ठरणार नाही. या कोरोना महामारी च्या काळात पण एकत्र येऊन आपल्या वडिलांच्या पुण्य तिथीला श्रद्धांजली अर्पण केली. ते कौतुकास्पदच म्हणावे लागेल.

यावेळी त्यांचे जावई, भाचे, भाची नातू, वहिनी असे सर्व कुटुंब उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com