शहादा येथे जीवंत अर्भक आढळले

अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल
शहादा येथे जीवंत अर्भक आढळले

नंदुरबार | प्रतिनिधी NANDURBAR

शहादा शहरातील नगरपालिका शाळा Municipal school क्रमांक ९ च्या कम्पाऊंडजवळ एक दिवसाचे स्त्री जातीचे जीवंत अर्भक Living infants of the female raceउघडयावर जखमी अवस्थेत आढळून आले आहे. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दि.२ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६.३० च्या सुमारास शहादा शहरातील न.प.शाळा क्रमांक ९ च्या कंपाऊंडजवळ अज्ञात व्यक्तीने एक दिवसाचे स्त्री जातीचे जीवंत अर्भक परित्याग करण्याच्या उद्देशाने उघडयावर टाकून दिले.

सदर अर्भक जीवंत असून जखमी अवस्थेत आढळून आले. याबाबत शिवलाल पावरा यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन भादंवि कलम ३१७ प्रमाणे शहादा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक माया राजपूत करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com