२० दिवसात विनामास्क फिरणार्‍या सहा हजार जणांकडुन ११ लाखाचा दंड वसूल

नंदुरबार जिल्ह्यात पोलीसांची कारवाई, ४४५ जणांवर गुन्हे दाखल
२० दिवसात विनामास्क फिरणार्‍या सहा हजार जणांकडुन  ११ लाखाचा दंड वसूल

नंदुरबार | प्रतिनिधी- nandurbar

कोरोनाचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी शासनाने सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर, सॅनिटायझर यासह विविध मार्गदर्शक सुचनांचे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत.

नंदुरबार जिल्ह्यात दि.२० फेब्रुवारी ते ११ मार्च या २० दिवसाच्या कालावधीत नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ५५८७ जणांकडुन ११ लाख ११ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तर ४४५ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

नंदुरबार जिल्ह्यात कोरोनाचा प्रादूर्भाव इतर जिल्ह्यांच्या तुलनेने कमी आहे. जिल्हा प्रशासनासह पोलिसांनी कोरोना रोखण्यासाठी कौतूकास्पद कामगिरी केली आहे. असे असले तरी अनेकांकडून नियमांचे उल्लंघन झाल्याचे बर्‍याचदा दिसून येते.

यास लगाम घालण्यासाठी पोलिसांकडून दंडात्मक कारवाई देखील करण्यात आली आहे. कोरोनाचा प्रादूर्भाव झाल्यानंतर मार्चपासून लॉकडाऊन करण्यात आले होते. सलग लॉकडाऊन असल्याने व्यवसाय, उद्योग, रोजगार ठप्प असल्याने अनेकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. मजूर वर्गावर उपासमारीची वेळ आली होती.

यामुळे शासनाने अटी-शर्तींसह काही नियम लागू करत लॉकडाऊनमध्ये काहीशी शिथिलता दिली होती. दरम्यान गेल्या काही दिवसात कोरोना रूग्णांची संख्या वाढतांना दिसत आहे. यामुळे जिल्हाधिकारी डॉ.राजेद्र भारूड व पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत यांच्या आदेशान्वये जिल्ह्यात सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर, सॅनिटायझर यासह विविध मार्गदर्शक सुचनांचे पालन न करणार्‍यांवर दि.२० फेब्रुवारी ते ११ मार्च या २० दिवसाच्या कालावधीत नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ५५८७ जणांकडुन ११ लाख ११ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तर ४४५ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

कोरोनाचा प्रादूर्भाव कमी झाला असला तरी धोका टळलेला नाही. शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. प्रत्येकाने सोशल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझरचा वापर करणे आवश्यक आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. यामुळे कोरोनाचा धोका टाळण्यासाठी नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन करण्यात आले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com