जिल्ह्यात 9 पॉझिटीव्ह ; 31 बळी
नंदुरबार

जिल्ह्यात 9 पॉझिटीव्ह ; 31 बळी

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

नंदुरबार - Nandurbar - प्रतिनिधी :

नंदुरबार जिल्ह्यात आज पुन्हा 9 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आला आहेत तर जिल्ह्यातील कोरोनाचा 31 वा बळी गेला आहे. नवापूर येथील एका 70 वर्षीय कोरोनाबाधित पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर चार जण संसर्गमुक्त झाले आहेत.

जिल्ह्यात आज 9 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले. यात नंदुरबार शहरातील विद्यानगरीतील 56 वर्षीय पुरुष, दुधाळे शिवारातील शिनकर नगरातील 38 वर्षीय पुरुष, 20 वर्षीय युवती, 10 वर्षीय बालक , अहिल्याबाई विहीर परिसरातील 54 वर्षीय व्यक्ती, तसेच नंदुरबार तालुक्यातील शनिमांडळ गावात 65 वर्षीय महिला,नंदुरबार तालुक्यातील दहिंदुले येथील 76 वर्षीय वृध्दा,शहादा येथील सिद्धार्थ नगरातरन 57 वर्षीय पुरुष,संभाजीनगरातील 67 वर्षीय व्यक्तींचा समावेश आहे.

सद्यपरिस्थिती पाहता जिल्ह्यातील नंदुरबार, शहादा तळोदा, नवापूर ही शहरे गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या हॉटस्पॉट बनली आहेत. दिवसेंदिवस येणार्‍या अहवालात सर्वाधिक रुग्ण नंदुरबार व शहादा या दोन शहरांमध्ये आढळून येत आहे. आता तीन दिवसांपासून ग्रामीण भागात ही कोरोनाचे रुग्ण आढळून येत असल्याने कोरोनाने आता गावांमध्येही शिरकाव केला आहे. नंदुरबार तालुक्यातील शनिमांडळ खोंडामळी दहिंदुले या गावांमध्ये कोरोनाने शिरकाव केला आहे.

दरम्यान नवापूर येथील इंदिरा नगरातील 70 वर्षीय पुरुष कोरोना बाधित आढळून आला होता. या बाधित वृद्धावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र आज दि.31 जुलै रोजी 70 वर्षीय बाधित वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यात मृतांची संख्या 31 झाली आहे. तसेच दुपारच्या अहवालात 4 कोरोना बाधित रुग्ण संसर्ग मुक्त झाले आहेत. यात शहादा येथील कुंभार गल्लीतील दोन व्यक्ती, शहादा येथील मच्छी बाजारातील एक व्यक्ती आणि नंदुरबार येथील जुनी भोई गल्लीतील एक व्यक्ती संसर्ग मुक्त झाले आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com