धडगाव येथे 9 लाखाची अवैध दारू जप्त

दोघांविरुद्ध गुन्हा दाखल, पोलिसांची धडक कारवाई
धडगाव येथे  9 लाखाची अवैध दारू जप्त

मोलगी | वार्ताहर - Molagi

शहादा-धडगावदरम्यान धडगाव पोलिसांनी (Dhadgaon Police) सापळा रचून (Set the trap) 9 लाखाच्या अवैध दारूसह (Illegal alcohol )22 लाखाचा मुद्देमाल जप्त (Confiscated) आहे. याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून एकास अटक(Arrested) करण्यात आली आहे.

काल मध्यरात्री शहादाकडून धडगावकडे अवैध दारुने भरलेला ट्रक येत असल्याची गुप्त माहिती धडगावचे पोलीस निरीक्षक गोकुळ औताडे यांना मिळाली.

त्यानुसार पोलिसांनी चोंदवाडे (ता. धडगाव) फाट्यावर रात्री 3.45 वाजता सापळा रचला. ट्रक (क्र.जीजे 16 डब्ल्यू 8554) हे वाहन अडवले असता ट्रक चालकाने उडवाउडवीची उत्तरे दिली.

परंतु ट्रकची झडती घेतली असता त्यात विना परवाना वाहतूक होणारी सुपर व्हिस्की या दारूचे तब्बल 100 बॉक्स आढळून आले. या बॉक्समध्ये प्रत्येकी 12 बाटल्या अशा एकूण 120 बाटल्या ताब्यात घेण्यात आल्या.

त्याची किंमत 9 लाख एवढी असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. 9 लाखाच्या दारुसह 13 लाखाचा ट्रक असा एकूण 22 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याप्रकरणी पोलीस कर्मचारी राजेंद्र चोरले यांच्या फिर्यादीवरुन ट्रक चालक मालसिंग उतऱ्या पाडवी रा. जुनीकरी पाडा (काकडदा) ता. धडगाव व मंगल हिम्मतसिंग पावरा रा.उमराणी बी. या दोन जणांविरुद्ध धडगाव पोलिसात महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम 65 (ई), 108 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्यापैकी मालसिंग उतऱ्या पाडवी यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, तर दुसरा आरोपी फरार आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक गोकुळ औताडे यांच्या मार्गदर्शनानुसार संजय मनोरे, राजेंद्र जाधव, विनोद पाटील, महेश कोळी, गणेश मराठे, हिरालाल सोनवणे व अभिमन्यू गावीत यांच्या पथकाने केली.

पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल भदाणे हे करत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com