निकाल
निकाल
नंदुरबार

बारावीच्या परीक्षेत नंदुरबार जिल्हयाचा ८०.३५ टक्के निकाल

Ramsing Pardeshi

नंदुरबार | प्रतिनिधी Nandurbar

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी, मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीचा निकाल आज ऑनलाईन जाहीर करण्यात आला. यात नंदुरबार जिल्हयाचा निकाल ८०.३५ टक्के लागला. नाशिक विभागात सर्वात कमी निकाल यंदा नंदुरबार जिल्हयाचा लागला आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी, मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीचा निकाल आज ऑनलाईन जाहीर करण्यात आला. यात नंदुरबार जिल्हयाचा निकाल ८०.३५ टक्के लागला. विज्ञान शाखेचा निकाल ९३.२८ टक्के, कला शाखेचा निकाल ६४.०७ टक्के, वाणिज्य शाखेचा निकाल ८८.३२ टक्के तर व्यावसायिक अभ्यासक्रमाचा निकाल ६०.७८ टक्के लागला.

नंदुरबार जिल्हयात एकुण १५ हजार ७२२ विद्यार्थी इयत्ता बारावीसाठी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी १२ हजार ६३३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. जिल्हयाचा एकुण निकाल ८०.३५ टक्के लागला. यात ७५३ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह प्रथम श्रेणीत, ५ हजार २७० विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ६ हजार २७५ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर ३३५ विद्यार्थी केवळ उत्तीर्ण झाले आहेत.

विज्ञान शाखा

नंदुरबार जिल्हयात विज्ञान शाखेत ८ हजार ७६ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी ७ हजार ५३३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यातील ६३७ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह प्रथम श्रेणीत, ३ हजार ५१३ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ३ हजार २३० विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर १५३ विद्यार्थी केवळ उत्तीर्ण झाले आहेत. जिल्हयातील विज्ञान शाखेचा निकाल ९३.२८ टक्के लागला.

कला शाखा

नंदुरबार जिल्हयात कला शाखेत ६ हजार ५२६ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी ४ हजार १८१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यातील २३ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह प्रथम श्रेणीत, १ हजार ४३८ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, २ हजार ५६३ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर १५७ विद्यार्थी केवळ उत्तीर्ण झाले आहेत. जिल्हयातील कला शाखेचा निकाल ६४.०७ टक्के लागला.

वाणिज्य शाखा

नंदुरबार जिल्हयात वाणिज्य शाखेत ८६५ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी ७६४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यातील ९२ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह प्रथम श्रेणीत, २६२ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ३८६ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर २४ विद्यार्थी केवळ उत्तीर्ण झाले आहेत. जिल्हयातील वाणिज्य  शाखेचा निकाल ८८.३२ टक्के लागला.

व्यावसायिक अभ्यासक्रम

नंदुरबार जिल्हयात व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी २५५ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी १५५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यातील १विद्यार्थी विशेष प्राविण्यासह प्रथम श्रेणीत, ५७ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ९६ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर १ विद्यार्थी केवळ उत्तीर्ण झाला आहे. जिल्हयातील व्यावसायिक अभ्यासक्रमाचा निकाल ६०.७८ टक्के लागला. नाशिक विभागात सर्वात कमी निकाल नंदुरबार जिल्हयाचा लागला आहे.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com