जिल्हयात आढळले ७१ नवे रुग्ण
नंदुरबार

जिल्हयात आढळले ७१ नवे रुग्ण

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

नंदुरबार - Nandurbar - प्रतिनिधी :

नंदुरबार जिल्ह्यातील 51 रुग्ण आज कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. दरम्यान, आतापर्यंत जिल्ह्यातील 5 हजार संशयित रुग्णांंच्या  स्वॅबची तपासणी करण्यात आली आहे.  त्यापैकी ९३० रूग्ण कोरोनाबाधीत आढळून आले आहेत.

त्यापैकी 47 जणांचा मृत्यू झाला असून 560 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. २७७ रूग्णांवर कोविड सेंटरमध्ये उपचार सुरु आहे. आज जिल्ह्यात नवे ७१ रुग्ण आढळले असून 169 जणांचा अहवाल अजूनही प्रलंबित आहे.

दरम्यान, रात्री ११ वाजता जिल्ह्यातील १७४ रुग्णांचा अहवाल प्राप्त झाला. यात कोरोणाचे नवे 71 रुग्ण आढळून आले आहेत. यात शहादा येथील 52, नंदुरबार येथील 11, तळोदा येथील पाच तर शिंदखेडा येथील एका रुग्णाचा समावेश आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com