नंदुरबार| प्रतिनिधी- NANDURBAR

धडगाव तालुक्यातील बेवडदा फाटयाजवळ पोलीसांनी ६० हजाराचा गांजा सह मोटारसायकल जप्त केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धडगाव तालुक्यातील बेवडदा फाटयाजवळ तेलखेडी रस्त्यावर शिवदास विरसींग पावरा हा त्याच्या ताब्यातील मोटारसायकल (एम.पी.४६,एम.बी,१९४१) यावर अवैध रित्या गांजाची तस्करी करीत असतांना पोलीसांनी त्यास पकडले.

त्याच्या ताब्यातुन पोलीसांनी ५६ हजार ८६८ रूपये किमंतीचा गांजा सह ३० हजाराची मोटारसायकल जप्त केली आहे.याप्रकरणी पोहेकॉ संजय मनोरे यांच्या फिर्यादीवरून धडगांव पोलीस ठाण्यात शिवदास विरसींग पावरा रा.गधडदेव ता.शिरपुर याच्या विरूध्द गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.याप्रकरणी पुढील तपास पोनि गोळुळ औताडे करीत आहेत.