जिल्हयातील ४६५ ग्रामपंचायती कोरोनामुक्त

उर्वरित २४ ग्रामपंचायत अंतर्गत ४७ कोविड रुग्णांवर उपचार सुरु
जिल्हयातील ४६५ ग्रामपंचायती कोरोनामुक्त

नंदुरबार | प्रतिनिधी

जिल्हयातील ४८९ पैकी ४६५ ग्रामपंचायती कोरोनामुक्त झाल्या आहेत. उर्वरित २४ ग्रामपंचायतींमध्ये ४७ कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत. धडगावातील सर्व ३४ ग्रामपंचायती कोरोनामुक्त झाल्या आहेत. लवकरच जिल्हयातील ग्रामीण भाग कोरोनामुक्त होण्याची शक्यता आहे.

नंदुरबार जिल्यातील ४८९ ग्रामपंचायती कोरोनाबाधीत झाल्या होत्या. यापैकी ४६५ ग्रामपंचायती कोरोनामुक्त झाल्या आहेत. उर्वरित २४ ग्रामपंचायतींमध्ये ४७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. नंदुरबार तालुक्यातील १३५ पैकी १२६ ग्रामपंचायती कोरोनामुक्त झाल्या आहेत. उर्वरित ९ ग्रामपंचायतींमध्ये १४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

नवापूर तालुक्यातील १०५ पैकी ९७ ग्रामपंचायती कोरोनामुक्त झाल्या आहेत. उर्वरित ८ ग्रामपंचायतींमध्ये १६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. शहादा तालुक्यातील ११४ पैकी १०९ ग्रामपंचायती कोरोनामुक्त झाल्या आहेत. उर्वरित ५ ग्रामपंचायतींमध्ये १५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

तळोदा तालुक्यातील ५४ पैकी ५३ ग्रामपंचायती कोरोनामुक्त झाल्या आहेत. उर्वरित १ ग्रामपंचायतींमध्ये एका रुग्णावर उपचार सुरु आहेत. अक्कलकुवा तालुक्यातील ४७ पैकी ४६ ग्रामपंचायती कोरोनामुक्त झाल्या आहेत. उर्वरित १ ग्रामपंचायतींमध्ये एका रुग्णावर उपचार सुरु आहेत. धडगाव तालुक्यातील ३३ पैकी ३४ ग्रामपंचायती कोरोनामुक्त झाल्या आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com