बंधारपाडा येथे ४५ हजाराचे अवैध सागवानी लाकूड जप्त

बंधारपाडा येथे ४५ हजाराचे अवैध सागवानी लाकूड जप्त

नवापूर |Navapur श.प्र.-

तालुक्यातील बंधारपाडा येथे ४५ हजाराचे अवैध सागवानी लाकूड Illegal teak wood वनविभागाने Forest Department जप्त केले आहे.

सहाय्यक वनसंरक्षक धनंजय पवार यांना मिळालेल्या गुप्त बातमी वरून वनक्षेत्रपाल राजेंद्र पवार यांनी पथकासह बंधारपाडा येथील रविदास श्यामा गावीत याच्या घराची झडती घेतली असता तेथे १ मोटरसह डिझाईन मशीन, १ इलेक्ट्रिक मोटर व ७१ साग नग कट साइज व फिनिश टिंबर माल अंदाजे ०.७५० घ. मी. साग माल मिळून आला. सदर मालाची बाजारभावानुसार अंदाजीत किंमत ४५ हजार रुपये आहे.

सदर कार्यवाही वनक्षेत्रपाल नवापूर आर.बी.पवार, वनरक्षक सतीश पदमोर, कमलेश वसावे, तुषार नांद्रे, रामदास पावरा, दीपा कापडणे, संजय बडगुजर, वाहन चालक चामार्‍या, वनमजूर सतीश गावीत व भदाणे यांनी केली .

सदर कार्यवाही मुख्य वनसंरक्षक दि.वा.पगार, उपवनसंरक्षक नंदुरबार के.बी. भवर, उमेश वावरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वन व वन्यजीव तसेच अवैधवाहतूक लाकूड संबधित कुठला गैरप्रकार निदर्शनास आल्यास तात्काळ टोल फ्री नंबर १९२६ वर संपर्क करावा असे अवाहन वनविभागातर्फे करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com