पिकअप व्हॅन उलटली 40 जण जखमी
नंदुरबार

पिकअप व्हॅन उलटली 40 जण जखमी

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

नंदुरबार - Nandurbar - प्रतिनिधी :

नवस फेडून परतणार्‍या ठेलारी समाज बांधवांचे पिकअप वाहन उलटून 35 ते 40 जखमी झाल्याची घटना भादवड गावाजनिक घडली आहे. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या तिघांना पुढील उपचारासाठी धुळे येथे हलविण्यात आले आहे.

याबाबत वृत्त असे की, शिंदखेडा तालुक्यातील शेवाडे येथील ठेलारी समाज बांधव नवस पुर्तीसाठी करून पिक वाहन (क्र.एम.एच.06 बी.जी.1797) ने परतीच्या प्रवासासाठी निघाले होते. दरम्यान भादवड गावानजीक वळणावर चालकाचे पिकअपवरील नियंत्रण सुटल्याने वाहन उलटून अपघात झाला.

रात्रीच्या 9 वाजेच्या सुमारास अपघात झाल्याने अंधारात जखमी आरडाओरड सुरू केली. जखमींना तात्काळ रूग्णवाहिकेद्वारे नंदुरबार जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले.

काळू ठेलारी, देवबा चंदन ठेलारी (7), काशिनाथ राघो ठेलारी हे तिघेही गंभीर जखमी झाल्याने पुढील उपचारासाठी धुळे येथे रवाना करण्यात आले.

नंदुरबार जिल्हा रूग्णालयात अपघातग्रस्तांच्या नातेवाईकांनी गर्दी केली होती. जखमींमध्ये लहान बालकांना मोठया प्रमाणावर समावेश आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com