जिल्ह्यात आढळले 37 करोना बाधीत रुग्ण
नंदुरबार

जिल्ह्यात आढळले 37 करोना बाधीत रुग्ण

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

नंदुरबार - Nandurbar - प्रतिनिधी :

जिल्ह्यात कोरोना रूग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. काल एकाच दिवसात 37 जणांना कोरोनाचा बाधीत आढळुन आले आहेत. यात नंदुरबार येथे 10,शहादा येथे 22,तळोदा येथे 3 तर नवापूर येथे एकाचा समावेश आहे.

लॉकडाऊननंतर तीनच दिवसात तब्बल 95 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान शहादा येथील नागसेननगर येथील एका बाधित 70 वर्षीय महिलेचा काल मृत्यू झाला.तर 16 जण कोरोना संसर्ग मुक्त झाल्याने त्यांना रूग्णालयातुन घरी परतले आहेत.

जिल्ह्यात कोरोना रूग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. काल एकाच दिवसात 37 जणांना कोरोनाचा बाधीत आढळुन आले आहेत.

यात नंदुरबार येथे 10,शहादा येथे 22,तळोदा येथे 3 तर नवापूर येथे एकाचा समावेश आहे. जिल्ह्यात कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने दि.23 ते 30 जुलै या कालावधीत नंदुरबार,शहादा,नवापूर व तळोदा या शहरांमध्ये सक्त लॉकडाऊन केले होते.

लॉकडाऊननंतर खुलल्यानंतर दि.31 जुलै रोजी 10, 1 ऑगस्ट रोजी 48 तर काल दि.2 ऑगस्ट रोजी 37 जणांचा असा गेल्या तीन दिवसात 95 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. काल 37 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून यामध्ये नंदुरबारातील आंबेडकर चौक येथील 75 वर्षीय महिला,रामनगरमधील 57 वर्षीय पुरूष,परदेशीपूरामधील 51 वर्षीय पुरूष,गणपती रोड परिसरातील 57 वर्षीय पुरूष,लहान माळीवाडा येथील 58 वर्षीय पुरूष,रायसिंगपूरा येथील 45 वर्षीय महिला,गणेशनगर धुळे नाका येथील 65 वर्षीय महिला,जूनी सिंधी कॉलनीतील 65 वर्षीय महिला, नंदुरबार तालुक्यातील भोणे येथील 20 वर्षीय युवक,नंदुरबार तालुक्यातील होळ तर्फे हवेली येथील 52 वर्षीय पुरूष, शहादा तालुक्यातील दामळदा येथील 32 वर्षीय पुरूष,शहाद्यातील संभाजीनगर येथील 31 वर्षीय पुरूष तर 60 वर्षीय महिला,मीरानगर येथील 52 वर्षीय पुरूष,रामनगर येथील 35,38,62,17,16,26 वर्षीय महिला तर 13,12 व 34 वर्षीय पुरूष,विजय नगर येथील 38 वर्षीय पुरूष,नागसेननगरमधील 55 वर्षीय महिला,तलाठी कॉलनी मलोणी येथील 22 वर्षीय युवक,भवानी चौकातील 32 वर्षीय पुरूष,शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथे 66 वर्षीय पुरूष,वैजाली येथील 18 वर्षीय युवती,रामचंद्रनगर येथील 34 वर्षीय पुरूष तर तांबोळी गल्लीतील 56 वर्षीय पुरूषाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.तसेच तळोदा येथील खान्देशी गल्लीतील 51 वर्षीय पुरूष,भोई गल्ली येथील 58 वर्षीय महिला,तक्षीत गल्ली येथील 27 वर्षीय तरूणाला कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

नवापूर येथील जनता पार्कमधील 54 वर्षीय पुरूष,निझर तालुक्यातील नवला येथील 60 वर्षीय महिला अशा 37 जणांचा कोरोना अहवाल काल पॉझिटिव्ह आला आहे.

दरम्यान काल 16 जण कोरोनामुक्त होवून घरी परतले आहेत. यामध्ये नंदुरबारातील 8,पळाशी येथील 1,शहाद्यातील 6 तर नवापूरातील एका जणाचा समावेश आहे.जिल्ह्यात मृत्यूदर व कोरोना संसर्गाचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com