कत्तलीसाठी जाणारे ३६ जनावरे जप्त

तळोदा येथील घटना : दोघांविरूध्द गुन्हा
कत्तलीसाठी जाणारे  ३६ जनावरे जप्त

मोदलपाडा ता.तळोदा - वार्ताहर Modalpada

तळोदा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात कत्तलीच्या इराद्याने कोंडून ठेवलेली सात लाख रुपये कमितीची ३६ जनावरे रविवारी सायंकाळी स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी पकडून ताब्यात घेतली आहे. याप्रकरणी दोघांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने तळोदा शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, तळोदा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवाराच्या आडोशाला ३६ गोवंश कत्तलीच्या इराद्याने पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी थेट सापळा रचत बाजार समितीत धडक मारली. तेव्हा हातोडा रस्त्यावरील बाजार समितीच्या एका कोपर्‍यात कुलूप लावलेल्या लोखंडी जाळीच्या दरवाजाच्या आत ३६ गोवंशीय बैल जातीचे जनावरे कत्तलीच्या इराद्याने दावणीला बांधलेले दिसून आले.

या जनावरांना कत्तलीसाठी खरेदी करून ते पुढे विक्रीच्या इराद्याने संबंधित व्यापार्‍यांनी आपल्या कबज्यात ठेवले होते. या प्राण्यांना चारा, पाणी, व निवार्‍या व्यवस्था न करता मोकळ्या मैदानात आडोशाला बांधलेले दिसून आले. त्यानंतर पोलिसांनी लागलीच दोघा पंचांना बोलवून त्यांच्या समक्ष पंचनामा करण्यात आला.

जनावरांबाबत पंचांसमोर विचारपूस केली असता रियाज खान रजाक कुरेशी रा. तळोदा व रसूल रहेमान कुरेशी रा. अक्कलकुवा यांची असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे या दोघ व्यापार्‍यांविरोधात तळोदा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या दोघ व्यापार्‍यांनी प्रत्येकी अठरा अठरा गोवंश त्यांच्या कबज्यात ठेवली होती. या ३६ जनावरांची किंमत साधारण ७ लाख रुपये असल्याचे पोलसानी सांगितले ही कारवाई पोलीस निरीक्षक पंडित सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली व सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश केदार, पो उप अभय मोरे, पोलीस नाईक विनोद नाईक, युवराज चव्हाण, राजढर जगदाळे, गणेश सोनवणे, मधुकर राऊत, पिंटू अहिरे आंनदा पाटील, स. फौ. गोसावी , बापू बागुल, विशाल नागरे यांच्या पथकाने केली आहे. दरम्यान पो हे दिलीप भाईदास साळवे यांच्या फिर्याडूवरून पोलीस ठाण्यात दोघा व्यापर्‍यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com