नंदुरबार

नंदुरबार जिल्हयात ३० नवे रुग्ण

10 जण करोनामुक्त

Ramsing Pardeshi

नंदुरबार- Nandurbar- प्रतिनिधी

नंदुरबार जिल्हयात आज पुन्हा 10 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून तीस नवे रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान, एका रुग्णाचा मृत्यू झाल्याने एकुण कोरोनाबळींची संख्या 44 झाली आहे.

नंदुरबार जिल्हयात आतापर्यंत ८१८ कोरोनाबाधीत रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी 488 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 44 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या 2४७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

दरम्यान, आज जिल्हयातील 10 कोरोना रुग्ण संसर्गमुक्त झाले. यात नंदुरबार येथील सहा, शहादा व नवापूर येथील प्रत्येकी दोन रुग्णांचा समावेश आहे. जिल्हयात आज नवे तीस रुग्ण आढळून आले आहेत.

यात नंदुरबार तालुक्यातील १५, शहादा तालुक्यातील ११, तळोदा तालुक्यातील ३ व नवापूर तालुक्यातील एका रुग्णांचा समावेश आहे.

शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथील 75 वर्षीय महिलेचा 6 ऑगस्ट रोजी मृत्यू झाला होता. परंतू तीचा कोरोना अहवाल आज पॉझिटीव्ह आला. त्यामुळे एकुण कोरोनाबळींची संख्या आता 44 झाली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com