नंदुरबार जिल्ह्यात २९ जण कोरोनामुक्त
नंदुरबार

नंदुरबार जिल्ह्यात २९ जण कोरोनामुक्त

१६ वर्षीय युवकाचा कोरोना मृत्यू

Ramsing Pardeshi

नंदुरबार । प्रतिनिधी Nandurbar

नंदुरबार जिल्ह्यात आज २९ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला तर नंदुरबार येथील एका १६ वर्षीय युवकाचा कोरोना मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ५१ झाली आहे. दरम्यान शहादा येथील दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

नंदुरबार जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात ५७ जण कोरोना संसर्गमुक्त झाले आहे. तर आज एकूण २९ जण कोरोना संसर्गमुक्त झाल्याने त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यात नंदुरबार येथील १३, शहादा येथील १४ तर नवापूर येथील एकाचा समावेश आहे.

दरम्यान आज नंदुरबार येथील १६ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या संख्या ५१ झाली आहे. दिवसेंदिवस नंदुरबार व शहादा येथे रूग्णांची संख्या वाढत आहे. त्यात आज शहादा येथील पुन्हा दोघांची भर पडली. शहादा येथील पोस्ट गल्लीतील ३२ वर्षीय पुरूष, गरीब नवाज कॉलनीजवळ ५२ वर्षीय पुरूष यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नंदुरबार जिल्ह्यात आतापर्यंत ६ हजार ९२ जणांचा स्वॅब घेण्यात आला आहे. त्यात ४ हजार २५१ अहवाल हे निगेटिव्ह आले आहे तर जिल्ह्यात आतापर्यंत १०१० कोरोन रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी ७९० कोरोना रूग्ण संसर्गमुक्त झाले आहे. तर २६७ रूग्णांवर कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू आहे. गेल्या दोन दिवसात ७९२ अहवाल प्रलंबित असल्याने नागरीकांची चिंता वाढली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com