जिल्हयात 24 रुग्ण करोनामुक्त
नंदुरबार

जिल्हयात 24 रुग्ण करोनामुक्त

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

नंदुरबार - Nandurbar - प्रतिनिधी :

नंदुरबार जिल्हयात आज कोरोनाचे एकुण 24 रुग्ण संसर्गमुक्त झाले. यात नंदुरबारातील 22 तर नवापूर व तळोदा येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. दरम्यान, निझर येथील एका 60 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.

नंदुरबार जिल्हयात आज 24 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने आज त्यांना जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत 472 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

एकुण कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या 772 झाली आहे. सध्या 223 रुग्णांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, आज निझर येथील 60 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com