नंदुरबार जिल्हयातील २२७ अहवाल प्रलंबित
नंदुरबार

नंदुरबार जिल्हयातील २२७ अहवाल प्रलंबित

९ रुग्ण करोनामुक्त

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

नंदुरबार - Nandurbar - प्रतिनिधी :

नंदुरबार जिल्हयात आज पुन्हा नऊ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आज नवे दोन रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान, 227 रुग्णांचे अहवाल प्रलंबित आहेत.

नंदुरबार जिल्हयात आतापर्यंत कोरोनाचे 482 रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी 307 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 24 रुग्णांचा मृत्यू झाला असून सध्या 139 रुग्णांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी 9 रुग्ण आज कोरोनामुक्त झाल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.

यात नंदुरबारातील अंबिका कॉलनी, खडेराव पार्क, लक्ष्मीनगर, जिल्हा रुग्णालय, परदेशीपुरा, सरोजनगर, मच्छीबाजार, येथील प्रत्येकी एक रुग्ण, तसेच जयनगर ता.शहादा व जुनी महादेव गल्ली येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.

दरम्यान, जिल्हयात आतापर्यंत 3 हजार 465 रुग्णांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 2 हजार 735 रुग्णांचा अहवाल निगेटीव्ह आला आहे. यापैकी 227 रुग्णांचा अहवाल प्रलंबित आहे.

Deshdoot
www.deshdoot.com