खापर येथे २२ लाखाचे विदेशी मद्य जप्त

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाची कारवाई
खापर येथे २२ लाखाचे विदेशी मद्य जप्त

नंदुरबार | प्रतिनिधी- NANDURBAR

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या (State Excise Department) भरारी पथकाने खापर (ता.अक्कलकुवा) येथे ट्रकमधून अवैधरित्या परराज्यात वाहतूक होत असलेले २२ लाख ३४ हजार ४०० रुपये किमतीचे विदेश मद्य जप्त केले. याप्रकरणी ३८ लाख ५१ हजार ४०० रुपये किमतीचा एकुण मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, खापर ता.अक्कलकुवा (Akkalkuwa) येथील हॉटेल ओमसाईराम (Hotel Omsairam) ढाबा ते गव्हाळी रस्त्यावर (Tata Company) टाटा कंपनीचा बारा चाकी ट्रक (क्र. आरजे २३ जेबी-१४९३) सदर वाहनाची तपासणी केली असता त्यात फ्रुटी पेयाचे बॉक्स,

व त्या बॉक्सच्या खाली परराज्यातील विदेशी मद्याचे ४८५ बॉक्स आढळून आले. वाहनासह आरोपी राकेश नारायणलाल जाट (वय-२६ वर्षे रा.खेडा,मोडी ता. वल्लभनगर जि.उदयपुर (राजस्थान) व छगनलाल कालूलालजी गाडरी (वय-१९,रा.गाडरीयावास ता.वल्लभनगर जि.उदयपुर (राजस्थान ) या इसमांना अटक करण्यात आली.

ट्रकमध्ये राजस्थान राज्यात निर्मीत व विक्रीसाठी असलेले पराराज्यातील विदेशी २२ लाख ३४ हजार ४०० रुपये किमतीचे मद्याचे ४८५ बॉक्स, फ्रुटीचे १ लाख २ हजार रुपये किमतीचे ११५ बॉक्से, तसेच टाटा कंपनीचा १५ लाख रुपये किमतीचा ट्रक असा एकुण ३८ लाख ५१ हजार ४०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर कारवाई महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ अंतर्गत कलम ६५(अ)(ई),८०,८१,८३,९०,९८(२),१०८ अन्वये करण्यात आली.

सदरची कार्यवाही राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप, संचालक श्रीमती वर्मा, विभागीय उपायुक्त अर्जुन ओहोळ, अधीक्षक युवराज राठोड नंदुरबार यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक नंदुरबारचे निरीक्षक डी.एम.चकोर, निरीक्षक बी.बी.सुर्यवशी, दुय्यम निरीक्षक एस.आर.नजन, हेमंत पाटील, हितेश जेठे, अविनाश पाटील, अजय रायते, हर्षल नांद्रे, एम.एम.पाडवी, संदीप वाघ, एम.के.पवार आदींनी केली. पुढील तपासडी.एम.चकोर निरीक्षक करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com