नंदुरबारच्या वैद्यकीय महाविद्यालयासाठी केंद्र सरकारकडून १९५ कोटी मंजूर
नंदुरबार

नंदुरबारच्या वैद्यकीय महाविद्यालयासाठी केंद्र सरकारकडून १९५ कोटी मंजूर

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

नंदुरबार - केंद्र शासनाने वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामासाठी 195 रुपयांचा निधी मंजूर केला आहे. महाविद्यालयासाठी लागणारी जागा टोकरतलाव रस्त्यावर उपलब्ध करुन देण्यात आली असल्याची माहिती खा.डॉ.हीना गावित यांनी पत्रकार परिषदेत दिली.

डॉ.गावित म्हणाल्या, नंदुरबार येथे वैद्यकीय महाविद्यालय मंजूर झाले असून या महाविद्यालयाच्या बांधकामासाठी लागणारी 16.63 हेक्अर जागा टोकरतलाव रस्त्यावर उपलब्ध झाली आहे.

नंदुरबार येथे मंजूर झालेल्या वैद्यकीय महाविद्यालयासाठी एकुण 325 कोटी खर्च अपेक्षित आहे. त्यापैकी 195 कोटी केंद्र सरकारने मंजूर केले आहे. हे महाविद्यालय झाल्यास आरोग्याचा प्रश्न सुटणार आहे. सतत केलेल्या पाठपुराव्यामुळे सदर निधी मंजूर झाल्याचा दावा डॉ.गावित यांनी केला. यावेळी आ.डॉ.विजयकुमार गावित उपस्थित होते.

Deshdoot
www.deshdoot.com