जिल्हयातील ३ टोळीतील १९ जण हद्दपार

४८ तासाच्या हात जिल्हयाबाहेर जाण्याचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत यांचे आदेश
जिल्हयातील ३ टोळीतील १९ जण हद्दपार

नंदुरबार NANDURBAR | प्रतिनिधी

आगामी गणेशोत्सव ( Ganeshotsav) व नवरात्रोत्सव (Navratri festival) काळात जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधीत रहावी याकरीता नंदुरबार जिल्ह्यातील ३ गुन्हेगारी टोळ्यांमधील एकुण १९ इसमांना पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित (Superintendent of Police Mahendra Pandit) यांनी जिल्हा हद्दीतून हद्दपार (Deportation) करण्याचे आदेश दिले आहेत. नंदुरबार जिल्ह्याच्या स्थापनेपासून एकाच वेळी १९ इसमांना हद्दपार करण्याची ही पहिलीच वेळ आहे. हद्दपार करण्यात आलेल्यांपैकी १४ इसम हे नंदुरबार शहरातील असून त्यांना दोन वर्षांसाठी तर ५ इसम हे शहादा तालुक्यातील असुन त्यांना एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे.

नंदुरबार शहरात तसेच जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेसाठी बाधा ठरणार्‍या इसमांना त्यांच्यावर दाखल गुन्ह्यांचा आढावा घेवून त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई करावी याबाबत पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी प्रभारी अधिकार्‍यांना आदेशीत केले होते.

त्यावरुन नंदुरबार शहर पोलीस ठाण्याकडून २ टोळ्या व शहादा पोलीस ठाण्याकडून १ टोळीस हद्दपार करण्याबाबतचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक कार्यालयात प्राप्त झाला होता. सदर हद्दपार प्रस्तावांची छाननी करुन योग्य कायदेशीर प्रकिया पार पाडून ०३ गुन्हेगारी टोळ्यातील १९ इसमांना हद्दपार करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिले आहेत.

नंदुरबार शहर हद्दीत राहणार्‍या दोन गुन्हेगारी टोळीतील १४ इसमांविरुध्द् शरीराविरुध्दचे गंभीर गुन्हे दाखल असून शहादा तालुका हद्दीत राहणार्‍या एका गुन्हेगारी टोळीतील ५ इसमांविरुध्द् मालमत्तेविरुध्दचे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

नंदुरबार शहर हद्दीत राहणारे पप्पु ऊर्फ फारुख खान जहिर खान कुरैशी, नायाब खान जहिर खान कुरैशी, फिरोज खान जहिर खान कुरैशी, सिकंदर खान जहिर खान कुरैशी, राजू ऊर्फ फिरदोस खान जहिर कुरैशी, मुश्तकीन शेख शहाबुद्दीन कुरैशी, शेख इस्तीयाक अहमद हाजी अब्दुल रज्जाक, शेख अब्दुल रशिद शेख अब्दुल रज्जाक कसाई, शेख अल्ताफ शेख जमिल कुरैशी, शेख कलिम शेख जमिल कुरैशी, शेख जुबेर शेख मुश्ताक कुरैशी, रियाज अहमद मुश्ताक अहमद कुरैशी, निहाल अहमद शेख अश्पाक कुरैशी, शेख शकिल शेख इसाक कसाई तर शहादा पोलीस ठाणे हद्दीतील महेंद्र धरम ठाकरे, आझाद विठ्ठल ठाकरे, मंगल शंकर ठाकरे, गोरख मोहन ठाकरे, शामा सरदार ठाकरे (सर्व रा.डामरखेडा ता. शहादा) यांना हद्दपार करण्यात आले आहे.

हद्दपार आदेशाची अमंलबजावणी तातडीने करण्यात येत असून हद्दपार इसमांनी आदेश प्राप्त झाल्यावर ४८ तासाच्या आत तातडीने जिल्हा हद्दीबाहेर निघून जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आदेशाचे उल्लंघन झाल्यास त्यांच्याविरुध्द प्रचलीत कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com