नंदुरबार | प्रतिनिधी

येथील नगरपालिकेच्या सन २०२१-२२ या वित्तीय वर्षासाठी १२१ कोटी ८६ लाख ८६ हजार ६८६ रुपयांच्या अंदाजपत्रकास मंजूरी देण्यात आली आहे. यात ४७ कोटीची कामे शासकीय अनुदान अंशदानमधील विकास कामांचा समावेश आहे.

या अंदाजपत्रकास आरोग्यदृष्टया विशेष भाग म्हणुन कोविड -१९ विषाणुच्या प्रादुर्भावामुळे पसरलेली रोगराई नियंत्रित करण्यासाठी १ कोटी रुपयांची उपयायोजना करण्यासाठी विशेष तरतुद करण्यात आली आहे. तसेच जोपर्यंत सर्वसामान्य नागरीकाना कोविड -१९ ची लस मिळत नाही तो पर्यत मी कोविड -१९ ची लस घेणार नाही. आगामी वर्षाच्या अंदाजपत्रकात कोणतीही करवाढ न करता, नागरीकांचे हित पाहता सर्व सुविधा युक्त अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. अंदाजपत्रकात केलेल्या तरतुदी या आगामी वर्षात पूर्ण केल्या जाण्याचा परिपूर्ण प्रयत्न केला जाईल. कोणतीही तरतूद अपूर्ण राहणार नाही.
- सौ.रत्ना रघुवंशी, नगराध्यक्षा, नंदुरबार नगरपरिषद

याशिवाय दारिद्रय रेषेखालील नागरिकांना कोविड लस मोफत देण्यासाठी व बायोगॅस प्रकल्पासाठी प्रत्येकी १ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

येथील पालिकेची स्थायी समितीची सभा काल नगराध्यक्षा सौ.रत्ना रघुवंशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यात सन २०२१-२०२२ या वित्तिय वर्षासाठी १२१ कोटी ८६ लाख, ८६ हजार, ६८६ रुपयांच्या अंदाजपत्रकास मंजूरी देण्यात आली. १४ लाख ८६ हजार ६८६ रुपये शिल्लक रकमेचे अंदाजपत्रक राहणार आहे.

सुवर्ण जयंती अंतर्गत दारिद्र रेषे खालील नागरीकांना कोविड लस मोफत देण्यासाठी १ कोटी, मोहल्ला क्लिनिक योजनेसाठी ५ लाख, डायलेसिस सेंटर व पॅथोलिजी लॅबसाठी १० लाख, नविन अग्नीशमन वाहन खरेदीसाठी १ कोटी,

वृक्षारोपण करणे व वनसंवर्धन करण्यासाठी १५ लाख, सांस्कृतिक कार्यक्रमासाठी ४ लाख, रोग प्रतिबंध जंतूनाशके खरेदी करण्यासाठी २० लाख, महिला व बाल विकास कामांसाठी ४० लाख, वाचनालय व ई लायब्ररीसाठी ५ लाख, चौक सुशोभीकरण करण्यासाठी ३० लाख,

पशु गणना व इतर शासकीय कामासाठी १० लाख, नगरपालिका कर्मचारी पगार पेन्शनसाठी २३ कोटी, प्रशासकीय कामकाजाकरीता ४.५० कोटी, नविन प्रशासकीय इमारत बांधण्यासाठी ५ कोटी, बायोगॅस प्रकल्प राबविण्यासाठी १ कोटी, क्रीडा व युवक कल्याणासाठी १० लाख,

दैनदिन पाणीपुरवठा जलशुध्दी करण योजनेसाठी ३ कोटी, विद्युत विभागासाठी २ कोटी, डांबरी रस्ते खडी रस्ते सिमेंन्ट रस्ते बांधण्यासाठी ६ कोटी, तसेच शासकीय अनुदान अंशदान मधुन विकास कामे करण्यासाठी ४५ कोटी आदी कामांचा या अंदाजपत्रकात समावेश आहे.